मुंबई : डासांची (mosquitoes) समस्या अगदी सामान्य असली, तरी लोक यामुळे अनेकदा त्रस्त असतात. बाराही महिने डासांची समस्या मेटाकुटीस आणणारी असते. सध्या उन्हाळा सुरु आहे, त्यातच राज्याच्या उर्जा मंत्रालयाकडून भारनियमनाचा इशारा देण्यात आला आहे. लाईट नसताना डासांचा होणारा त्रास, कानाभोवतीची त्यांची भूणभूण अगदी नकोशी वाटत असते. डासांच्या डंख अनेकदा आपल्या जिवावरदेखील बेतू शकतो. डेंग्यू, मलेरियाने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू (Death) होत असतो. त्यामुळे डासांच्या डंखाचीही एक वेगळीच भीती असते. अनेक घरांमध्ये सायंकाळच्या वेळी डासांच्या भीतीने दारे, खिडक्या बंद करुन घरातून जायबंदी होण्याची वेळ येत असते. या सर्व समस्या बघता डासांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक रासायनिक प्रोडक्टचा (Product) वापर करावा लागत असतो. परंतु यातून आपल्या शरीरालाही हानी पोहचत असते. त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून आपण डासांवरील घरगुती उपाय पाहणार आहोत.
जेवणाची लज्जत वाढवणारा लसूण सर्वच ठिकणी अगदी गुणकारी ठरत असतो. लसणाचे त्वचेसाठीही अनेक फायदे आहेत. परंतु याचा वापर डासांना पळवून लावण्यासाठीही करण्यात येत असतो. लसणाचा वास डासांना आवडत नसल्याचे म्हटले जात असते. त्यामुळेच डासांसाठी लसणाचा वापर केला जात असतो. लसणाच्या पाकळ्या चांगल्या कुटून घ्याव्यात, त्यानंतर त्याला पाण्यात उकडून घ्यावे, हे मिश्रण गार झाल्यावर त्याला स्प्रे बाटली टाकून फवारणी करावी.
पुदीन्याच्या पानांचा गंध हा डासांना त्रासदायक ठरत असतो. त्यामुळे यापासून डास लांब राहतात. तुम्ही पुदीन्याच पाणी करुन ते घरात शिंपडू शकतात. तसेच बाजारात उपलब्ध असलेले पुदीन्याचे ऑइल घरात स्प्रे करुनदेखील तुम्ही डासांपासून स्वत:ची सुटका करु शकतात. आपल्या घराचे दरवाजे, खिडक्या आदींवर याची फवारणी केल्यास डास तुमच्या घरापासून लांब राहतील.
फार पूर्वीपासून डासांच्या समस्येवर कडूलिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. अनेक ठिकाणी कडूलिंबाची पाने जाळून त्याच्या धुराच्या माध्यमातून डासांना पळवून लावले जात असते. यासोबतच कडूलिंबाच्या तेलाच्या मदतीनेही डासांना घरापासून लांब ठेवता येते. कडूलिंबाचे तेल घेउन त्यात, पाणी मिसळून त्वचेवर लावावे. यामुळे डास तुमच्या शरीरापासून लांब राहतील.
इतर बातम्या
दररोज सकाळी जिमला जाण्याचा येतो कंटाळा? मग हे उपाय करा आणि घरीच आपले वजन कमी करा!
Skin Care : महागड्या उत्पादनांपेक्षा कोरफडचा अशाप्रकारे वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!