Home Remedies for Bleeding Gum | ब्रश करताच हिरड्यांतून येते रक्त ? घाबरू नका, या घरगुती उपायांनी मिळेल आराम

| Updated on: Jul 14, 2023 | 4:11 PM

ब्रश करताच काही लोकांच्या हिरड्यांमधून रक्त येऊ लागते. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही यापासून आराम मिळवू शकता.

Home Remedies for Bleeding Gum | ब्रश करताच हिरड्यांतून येते रक्त ? घाबरू नका, या घरगुती उपायांनी मिळेल आराम
Image Credit source: freepik
Follow us on

How to stop bleeding gums at home : दात घासायला सुरूवात करताच तुमच्या हिरड्यांमधूनही रक्त (bleeding gum) येऊ लागतं का ? जर याचं उत्तर हो असेल तर त्यामागे अनेक कारणे (causes) असू शकतात हे समजून घ्या. पायरियामुळे अनेक वेळा हिरड्यांमधून रक्त येऊ शकतं. हिरड्या कमकुवत होणं, त्यामध्ये पू होणं, सूज येणं अशा कारणांमुळेही ब्रश करताना रक्त येऊ शकतं. जर तुमच्या हिरड्या कमकुवत असतील त्यामुळेही रक्त येऊ (Gum Bleeding) शकतं.

मात्र यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, कारण ही अतिशय सामान्य समस्या आहे. दात किडणे, पिवळेपमा या गोष्टींमुळेही हिरड्यांवर नकारात्मक परिणाम
होतो. मात्र हिरड्यांमधून सतत रक्त येत असेल डॉक्टरांना दाखवणे गरजेचे ठरते. काही घरगुती उपायांनीही तुम्ही आराम मिळवू शकता.

हिरड्यांमधून रक्त आल्यास रोखण्याचे उपाय

  1. व्हिटॅमिन सी, के, अशा जीवनसत्त्वांची शरीरात कमतरता असेल, तसेच हार्मोन्समधील चढउतार, मधुमेह, रजोनिवृत्ती, गर्भधारणा, हिरड्यांचे आजार इत्यादी कारणांमुळे हिरड्यांमधून रक्तस्त्राव सुरू होतो. या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्हाला तोंडाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे असते. त्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा ब्रश करा तसेच एकदा फ्लॉसिंगही करावे.
  2. हिरड्यांमधून रक्त येत असेल तर मऊ ब्रिसल्स असलेल्या ब्रशचा वापर करावा. जास्त टणक ब्रिसल्स असतील तर हिरड्या सोलवटू शकतात, ज्यामुळे सूज येणे, जखम होणे व नंतर रक्त येणे असा त्रास होऊ शकतो.
  3. हिरड्यांमधून रक्त आल्यास मीठ घातलेल्या गरम पाण्याने गुळण्या कराव्यात. तसेच अँटी-बॅक्टेरिअल माऊथवॉशही वापरू शकता. ते अनेक मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असते.
  4. अनेक वेळा धूम्रपान केल्यानेही दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या निर्माण होतात. जास्त सिगारेट ओढल्याने फुफ्फुसाचे नुकसान तर होतेच पण ओठही काळे होतात. हिरड्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जास्त धूम्रपानाची सवय कमी करणे उत्तम ठरते.
  5. ऑईल पुलिंग (Oil Pulling) केल्यानेही दात आणि हिरड्यांच्या समस्या कमी होऊ शकतात. त्यासाठी थोडं नारळाचं तेल तोंडात घेऊन गुळण्या कराव्यात व नंतर ते थुंकून टाकावे. दोन-तीन वेळा हा उपाय केल्याने फायदा होऊ शकतो.
  6. तुमच्या घरात कोरफडीचे रोप असेल तर तुम्ही त्याचे जेल देखील वापरू शकता. कोरफडीचा ताजा रस काढावा आणि हिरड्या आणि दातांवर घासावे. यामुळे रक्तस्त्राव थांबेल आणि दातांनाही फायदा होईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)