नवी दिल्ली : गरोदरपणा (pregnancy) हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्वपूर्ण अनुभव (experience)असतो. नवा जीव जन्माला येणार आणि आई बनणार ही भावना स्त्रीसाठी खूप खास व अनमोल असते. मात्र प्रेग्नन्सी प्लॅन (planning a baby)करायचा विचार असेल तर अशावेळी आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेणे गरजेचे आहे. बाळासाठी प्लॅनिंग करताना आधी शरीराला योग्य सवयी लावणे आणि अयोग्य वा हानिकारक सवयी सोडवणे महत्वाचे ठरते. अन्यथा त्याचा तुमच्या व बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कन्सिव्ह (गर्भधारणा) करण्यापूर्वी शरीर (be healthy) स्वस्थ राहणे अत्यंत आवश्यक आहे.
तुमच्या आरोग्याचा तुमच्या प्रजनन पातळीवर (fertility status)महत्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. तसेच त्याचा न जन्मलेल्या बाळावरही प्रभाव पडू शकतो. मात्र या वाईट सवयी सोडवणेआव्हानात्मक असले तरी, काही सवयी आहेत ज्यांना तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असताना, तुमच्या न जन्मलेल्या बाळाचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांना ‘नाही’ म्हणणेच आवश्यक आहे.
गरोदरपणापूर्वी या 6 सवयी पूर्णपणे सोडवा
धूम्रपान
धूम्रपान हे प्रत्येक व्यक्तीसाठी धोकादायक आहे, विशेषत: गर्भधारणेचा प्रयत्न करताना तर हे अतिशय हानिकारक ठरू शकते. हे तुमच्या बाळाच्या रोगप्रतिकारक शक्ती, फुफ्फुस आणि मेंदूच्या विकासास हानी पोहोचवू शकते, परिणामी बाळामध्ये अनेक आजार आणि जन्मजात दोष निर्माण होतात. इतकंच नव्हे तर त्यामुळे प्रजननक्षमतेची समस्या उद्भवू शकते आणि गर्भपात होऊ शकतो. आणि ही गोष्ट तुमच्या जोडीदारालाही लागू होते. धूम्रपान केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते, डीएनए खराब होतो आणि पुरुषांमधील शुक्राणूंची गतिशीलता आणि प्रजनन क्षमता कमी होते.
तुमच्या खाण्याच्या सवयी बदला
तुम्ही खाण्याच्या पद्धतीचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तुम्ही येता-जाता (सतत) खाणे टाळावे कारण ते तुमच्या पचनाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. चालता-फिरता खाल्ल्याने तुम्ही ते कमी चाऊन खाता, त्याचा थेट परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो. यामुळे मोठे अन्नकण तुमच्या पचनमार्गात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे पचनासाठी अन्न तोडणे कठीण होते. हे तुमच्या कोर्टिसोलची पातळी देखील वाढवते आणि तुमच्या ॲड्रेनलवर परिणाम करते. एड्रेनल ही एक लहान ग्रंथी आहे जी स्टिरॉइड संप्रेरक, ॲड्रेनालाईन आणि नॉरॲड्रेनालाईन तयार करते. हे संप्रेरक हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि शरीराच्या इतर महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. गर्भधारणेपूर्वी लगेच ॲड्रेनल्स मजबूत करणे महत्वाचे आहे जेणेकरून तुमचे शरीर तुमच्या न जन्मलेल्या बाळासाठी निरोगी ॲड्रेनल्स विकसित करण्यास मदत करू शकेल.
कॅफेन
जर तुम्हाला सकाळी उठल्यावर लगेच चहा-कॉफी प्यायची सवय असेल किंवा तुम्ही त्याशिवाय राहूच शकत नसाल, अथवा दिवसभर कॉफी पीत असाल, तर दी सवय सर्वात आधी सोडवा. तुम्ही तुमचे रोजचे सेवन कमी करून कॅफिनचे व्यसन सोडू शकता. डिकॅफिनेटेड कॉफीसह सर्व प्रकारची कॉफी आम्लयुक्त असते आणि शरीराला आणि गर्भाशयाच्या श्लेष्माला जास्त प्रमाणात आम्लयुक्त बनवते, ज्यामुळे गर्भधारणेत अडथळा येतो.
मद्यपानाला म्हणा NO
जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल तर तुम्ही दारूची सवय सोडली पाहिजे. अल्कोहोलचे वारंवार आणि जास्त सेवन हे तुमच्या यकृत आणि मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्याचा तुमच्या मुलावर अनुवांशिक परिणाम होतो. अल्कोहोलची थोडीशी मात्रा देखील तुमच्या गर्भासाठी हानिकारक आहे, हे लक्षात ठेवणे अतिशय महत्वाचे आहे.
तणाव कमी करावा
तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अथवा जीवनाचा एक सामान्य भाग बनला आहे. या वेगवान जीवनात ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीवर कामाचा दबाव आहे आणि त्यांना वैयक्तिक समस्याही आहेत, अशा परिस्थितीत तणाव न येणे हे अतिशय कठीण होऊ शकते. परंतु, तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, व्यायाम आणि मेडिटेशन यासारख्या आरोग्यदायी पद्धतींचा समावेश करून तणावाची पातळी कमी केली पाहिजे. तणाव गर्भधारणा आणि प्रजनन उपचारांच्या यशावर परिणाम करू शकतो.
पुरेशी झोप अत्यंत महत्वाची
गर्भधारणेचे नियोजन करताना पुरेशी झोप घेतली पाहिजे. अपुऱ्या झोपेमुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो आणि तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. स्लीप-वेक हार्मोन्स (मेलाटोनिन आणि कॉर्टिसॉलसह) नियंत्रित करणारे मेंदूचे क्षेत्र स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये पुनरुत्पादक हार्मोन्सच्या उत्सर्जनावर देखील नियंत्रण ठेवते.
त्याच वेळी, गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी, तुम्ही गर्भधारणेच्या सर्वोत्तम वेळेबद्दल चर्चा करण्यासाठी स्त्रीरोगतज्ञाला देखील भेटले पाहिजे. तसेच, निरोगी वजन राखा आणि तुमच्या बाळाचे चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी गर्भधारणेपूर्वी वाईट सवयी सोडून द्या.