बदलत्या लाईफस्टाईलने उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. याच मुख्य कारण बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव असे म्हटले जाते. रात्री उशीरा झोपणे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. सर्वसाधारणपणे उच्च रक्तदाबाची लक्षण समजत नाहीत. परंतू त्यावर वेळेत उपचार न केल्यास हृदयाचा आजार, स्ट्रोक आणि ब्रेन स्ट्रोक देखील होऊ शकतो.त्यामुळे हाय बीपीला सायलेन्ट किलर मानले जात आहे. जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहात तर तो नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत हे पाच बदल कराच…
हाय बीपी होण्यामागे व्यायाम न करणे हे देखील एक कारण असते. तज्ज्ञांच्या मते एकाच जागी बसून काम केल्याने शरीराचे नुकसान होते. त्यात बीपी एक समस्या आहे. एक्सरसाईजला आपल्या लाईफ स्टाईलचा एक भाग बनविले तर बॉडी एक्टीव्ह राहून बीपी नियंत्रणात राहातो.
जर तुम्ही अरबट चरबट खात असाल तर तुमच्या आहारात बदल करायला हवा. रेडी टू इट पदार्थांचे प्रमाण कमी केले पाहीजे. जंक फूडमध्ये साखर आणि सोडियमचे प्रमाण खूप जादा असते. त्यामुळे हाय बीपी अन्य आजार होतात.त्यामुळे आहारात हिरव्या पाल्याभाज्या, कडधान्य, फळे आणि डेअरी प्रोडक्ट सारखे पोषक पदार्थांचा समावेश करावा.
झोप अपुरी होत असेल तरी देखील ब्लडप्रेशर वाढते. त्यामुळे शरीराला योग्य आराम आणि विश्रांती देणे गरजेचे आहे. चांगली झोप घेतल्याने देखील ब्लड प्रेशर नियंत्रणात येते.
अनेकदा लठ्ठपणा आणि वजनावर नियंत्रण नसल्याने देखील उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. लठ्ठपणा हायबीपीसह अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यासाठी एकाच जागी जास्तवेळ बसू नका. व्यायामासाठी वेळ काढा.तसेच प्रमाणाच्या बाहेर अन्न खाऊ नका, फास्ट फूडपासून चार हात दूर राहा..हे सर्व केल्यास बीपी कंट्रोल ठेवण्यास मदत होईल.
तणावाचा थेट परिणाम आपल्या रक्तदाबावर पडतो. तणावात असताना आपल्या शरीरातून एड्रेनालाईन (adrenaline ) आणि कोर्टिसोल ( cortisol ) सारखे हार्मोन्स शरीरातून बाहेर पडत असतात. त्यामुळे व्यक्तीचे हृदय वेगाने धडधडू लागते. तसेच रक्तवाहीण्या आंकुचन पावतात. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि अन्य शारीरिक समस्या तयार होतात. तणाव कमी करण्यासाठी व्यायाम, योगासने आणि खोल श्वास घेणे अशा प्रकारे रक्तदाबात नियंत्रण मिळविता येते.