मुंबई : सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये अनेक आजार निर्माण होत असतात. मग ताप, थंडी, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होताना दिसतात. त्यात थंडीच्या दिवसात लोक जास्त पाणी पित नाहीत. कारण हिवाळ्यामध्ये जास्त तहान लागत नाही. त्यामुळे लोकं फार कमी पाणी पितात. मग कमी पाणी पिल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम दिसतात. मग लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.
किडनीवर वाईट परिणाम- जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाणी पिलं तर त्याचा तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होतो. किडनीवर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नसेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर किडनीवर दबाव येतो, त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा ट्रॅकमध्ये जळजळ अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये तहान जरी लागली नाही तरी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
अशक्तपणा येतो – थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाणी पिले तर शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. पाण्याच्या कमतरतामुळे आपले शरीर कमजोर होते त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची, ऑक्सिजनची कमतरता भासते. मग आपल्याला थकवा येतो अशक्तपणा येतो. त्यामुळे प्रत्येकाने भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
पोटाशी संबंधित आजार – शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा परिणाम आपल्या पोटावर होतो. मग बद्धकोष्ठतापासून ते अन्नपचनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. तर अशा गंभीर समस्यांचा सामना करायचा नसेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
त्वचा निस्तेज होते – शरीरात पाण्याची कमतरता असेल तर आपले शरीर हायड्रेट राहत नाही. तसेच शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आपली त्वचा निस्तेज होते म्हणजेच आपली त्वचा कोरडी पडते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची त्वचा कोरडी पडू द्यायची नसेल आणि दिवसभर ओलसर ठेवायची असेल तर दररोज पाच ते सात ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
थंडीच्या दिवसांमध्ये निरोगी राहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने तीन ते चार लिटर पाणी पिणे खूप गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांमध्ये गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी प्या, यामुळे तुम्हाला कोणतेही आजार होणार नाहीत.