तुम्हालाही असतील आरोग्याच्या या समस्या, तर आजच थांबवा टोमॅटोचे सेवन

| Updated on: Jul 13, 2023 | 3:19 PM

टोमॅटोचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण आयुर्वेदानुसार शरीरात काही त्रास असेल तर टोमॅटोचे सेवन करणे टाळावे.

तुम्हालाही असतील आरोग्याच्या या समस्या, तर आजच थांबवा टोमॅटोचे सेवन
Image Credit source: freepik
Follow us on

Tomato Side Effects : टोमॅटोचे भाव (Tomato price) सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक लोकांच्या किचनमधून टोमॅटो गायब झालेले दिसत आहेत. टोमॅटो जेव्हा स्वस्त असतात, तेव्हा बहुतांश डिशमध्ये त्यांचा वापर होतो. भाजी, सूप, चटणी अनेक डिशेस बनवल्या जातात. टोमॅटो खाणं (Tomato) फायदेशीरही असतं. पण आयुर्वेदानुसार शरीरात काही त्रास असेल तर टोमॅटोचे सेवन (Tomato Side Effects)करणे टाळावे. तसे न केल्यास तुमचा त्रास आणखी वाढू शकतो. खाली नमूद केलेल्या गोष्टींपैकी कोणताही त्रास असेल तर टोमॅटो खाऊ नयेत.

संधिवात

आर्थ्रायटिस म्हणजेच संधिवाताचा त्रास होत असेल तर टोमॅटो न खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच गॅस व ॲसिडिटी असेल तर तेव्हाही टोमॅटो खाणं टाळावं. अशा लोकांनी चुकूनही कच्चा टोमॅटो खाऊ नये.

गॅस ॲसिडिटी वा अल्सर

आयुर्वेदानुसार गॅस, ॲसिडिटी किंवा अल्सर यांचा त्रास असेल तर त्यावेळीही टोमॅटो खाऊ नये. याचे सेवन केल्याने शरीरातील पचनक्रिया मंदावते आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. अपचन, तसेच छातीत जळजळ हा त्रास वाढू शकतो.

मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे

ज्या महिलांना मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होतो, त्यांनी टोमॅटोपासून लांब रहावे. टोमॅटो सूप, टोमॅटो सॉस हे पदार्थ खाऊ नयेत. यामुळ शरीरातील त्रास वाढू शकतो.

किडनी स्टोन

एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या असेल तर त्याने चुकूनही टोमॅटो खाऊन नयेत. कारण टोमॅटोमध्ये कॅल्शिअम ऑक्सलेट असते, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. टोमॅटोच्या बिया पोटात पचत नाहीत आणि त्या किडनीत साठू शकतात. त्यामुळे स्टोनचा त्रास वाढू शकतो.

स्किन ॲलर्जी

स्किन ॲलर्जी किंवा शरीराला खाज येणे असा त्रास होत असेल तर टोमॅटोला हातही लावू नये, ते धोकादायक ठरू शकते. टोमॅटो, बटाटा, वांग, आंबट फळं व
मसालेदार पदार्थ यामुळे शरीरात पित्तदोष वाढतो. ज्यामुळे खाज वाढू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)