आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना ताण आणि तणावाचा सामना करावा लागत आहे. हसल्याने आणि आनंदी राहिल्याने अनेक आजारांपासून आपण दूर रहातो.हसल्याने आपल्या शरीरातील स्रायूंवरील ताण कमी होतो. आपण टीव्हीवरील कार्टून पाहून हसा किंवा न्यूजपेपरमधील जोक वाचून हसा. हसण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या हसल्याने ताण कमी होतोच शिवाय तुमच्या मांसपेशींना ४५ मिनिटांपपर्यंत आराम पडतो.त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होता. हसल्यामुळे शरीरातील ट्रेस हार्मोन लेव्हल कमी होतो. जो शरीराच्या एंटीबॉडीजसाठी फायद्याचा असतो.
हसल्याने हृदयाचे आरोग्य देखील चांगले रहाते. तसेच डिप्रेशन, एंग्जायटी सारख्या मानसिक समस्यांना दूर ठेवण्यास मदत होते. यामुळे हृदयविकार आणि अनेक समस्यांना दूर ठेवण्यात मदत होते. जे लोक मोकळेपण हसतात ते लोक अधिक आनंददायी आणि आरोग्यदायी जीवन जगतात असे संशोधनातून निष्पन्न झाले आहे.त्यामुळे आजकल लाफ्टर थेरपीला अधिक महत्व दिले जात आहे.
जेव्हा आपण खळखळून हसता तेव्हा एंडोर्फिन नावाचे हार्मोन रिलीज होते. हे स्ट्रेसला कमी करण्यास मदत करते.तसेच इम्युनिटी वाढविण्यास देखील मदत करते. यामुळे आजारांशी लढण्यासाठी ताकद मिळते.
असे म्हणतात हसल्याने मोठ मोठे आजार दूर होतात. जर तुम्ही आनंदी असाल आणि मोठ्या हसत असाल तर ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार दूर होतात.
हसल्याने शरीरातील सेरोटोनिन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते. त्यामुळे आपला मूड चांगला होतो. आणि डिप्रेशन आणि एंग्जायटीचा धोका कमी होतो.
हसल्याने एडोर्फिन हार्मोनचे उत्पादन वाढते. जे स्ट्रेस, एंग्जायटी आणि डिप्रेशनला दूर करते. हसल्याने आपले मानसिक आरोग्य चांगले रहाते.ज्यामुळे आपल्या स्मृतीत चांगली वाढ होते, मेंदू चांगले कार्य करु लागतो.
लाफ्टर थेरपीने अनिंद्रेच्या समस्या दूर होतात. हसल्याने आपल्या शरीरातील मेलानिन हार्मोनचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते.
लाफ्टर थेरपीच्या मदतीने शरीरात नेचरल पेनकिलर हार्मोन रिलीज होतात. त्यामुळे डोकेदुखी, मायग्रेन आणि सांधेदुखीत आराम मिळतो.
हसल्याने हाय ब्लड शुगरची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो. तसेच तुम्ही आतून आनंदी राहू लागता.
हसल्याने डोक्यातील ऑक्सीजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपली मेमरी चांगली होते. मेंदूचा थकवा दूर होतो. आपल्याला शरीराला यामुळे रिचार्ज व्हायला होते.
लाफ्टर थेरपी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ज्यात हसण्याला एक एक्सरसाईज प्रमाणे मानले जाते. ही थेरपी खासकरुन तणाव, चिंता, डिप्रेशन आणि अन्य मानसिक समस्यांपासून आराम देण्यासाठी असते.
दररोज कॉमेडी चित्रपट वा मजेदार व्हिडीओ पाहावे
जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद लुठा
कुटुंब आणि मित्रांसोबत अधिक वेळ व्यतित करा आणि मोकळेपणे हसा
लाफ्टर योगा क्लब किंवा ग्रुप जॉईंट करा