नवी दिल्ली : प्रत्येकाला प्रवास करायला आवडतो. जेव्हा कधी संधी मिळते किंवा सुट्टी असते तेव्हा आपण नवीन ठिकाणी जाण्याचा बेत आखतो. परंतु काही जण यातून स्वतःला वगळतात कारण त्यांना कार, फ्लाइट किंवा ट्रेनमध्ये जास्त वेळ बसणे कठीण जाते. या समस्येला ‘मोशन सिकनेस’ (motion sickness) म्हणतात. असे लोक इतरांप्रमाणे लांब प्रवासाचा आनंद घेऊ शकत नाहीत. मोशन सिकनेस ही एक कठीण स्थिती असू शकते. कारण हा त्रास होणाऱ्या लोकांना चालत्या वाहनांमध्ये (feeling uneasy while travelling) मळमळ झाल्यासारखे वाटते, क्वचित उलटीचा (vomit) त्रासही होऊ शकतो. अशा वेळी ती लोकं स्वतःचं लक्ष दुसऱ्या गोष्टीत गुंतवून घेण्यासाठी गाणी ऐकतात. पण ते पुस्तक वाचणे किंवा मोबाइल पाहणे, अशा क्रिया करू शकत नाहीत, कारण एका जागी फार वेळ नजर स्थिर केल्याने त्यांचं डोकं दुखू लागतं, चक्कर आल्यासारखीही वाटते.
तुम्हालाही गाडीत बसल्यावर असा त्रास होत असेल तर तो टाळण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घ्या. ते फॉलो केल्याने तुमचा प्रवास आरामदायी होऊ शकतो.
मोशन सिकनेसपासून आराम मिळवण्यासाठी टिप्स –
1) बडीशेप
जेव्हा तुम्हाला मळमळ होत असेल तेव्हा बडीशेप तुम्हाला त्यापासून वाचवू शकते. रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर बडीशेप का दिली जाते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कारण बडीशेप ही पचनासाठी उत्तम मानली जाते. बडीशेपमध्ये कार्मिनिटिव्ह गुणधर्म असल्याचे म्हटले जाते, याचा अर्थ ते गॅस आणि सूज कमी करण्यास मदत करते. जरी तुम्हाला सहसा मोशन सिकनेस होत नसेल तरीही, तुम्ही असे काहीतरी खात असाल जे तुमच्या सिस्टमशी सहमत नसते. अशा वेळी सामान्य अपचनामुळे सहजपणे उलट्या होऊ शकतात. विशेषत: चालत्या वाहनात हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी वाहनात बसतानाचा बजीशेप सोबत ठेवून ती चघळत रहा.
2) विना साखरेची बिस्कीटे
जेव्हा तुम्हाला मळमळल्यासारखे वाटत असेल तेव्हा साखर नसलेली बिस्किटे खा. प्रवासादरम्यान अशा मऊ पदार्थांचे सेवन करणे चांगले असते. चव नसलेली बिस्किटे खा. बरीचशी साधी बिस्किटे हलकी खारट किंवा गोड असतात, ज्यामुळे ती खूप रुचकर लागतात. ती फायदेशीर आहेत कारण त्यामध्ये स्टार्च जास्त असतो, जो तुमच्या सिस्टममध्ये संतुलन राखण्यास मदत करतो.
3) केळं
केळं हे तुम्हाला तुमची उर्जा पातळी राखण्यास मदत करते. प्रवासात तुम्ही आजारी पडल्यास (उलट्या किंवा जुलाब) तुम्हाला अशक्तपणा जाणवतो आणि तुमच्या शरीरात पोटॅशियम कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मोशन सिकनेसचा त्रास होत असेल तर केळं खाणं हा एक चांगला पर्याय आहे. ते निरोगी पचन करण्यास देखील मदत करतात. तसेच त्यांची चव इतर फळांपेक्षा सौम्य असते. तसेच वाटेत ते खाणेही खूप सोपे जाते.
4) वेलची
आलं आणि बडीशेप व्यतिरिक्त, प्रवासादरम्यान एक किंवा दोन पूर्ण वेलची चघळल्याने देखील मोशन सिकनेसचा प्रभाव बर्याच प्रमाणात कमी होतो. वेलची ही आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. शिवाय, त्यासाठी फार तयारी करावी लागत नाही. गाडीत बसण्यापूर्वी केवळ ती आठणीने बॅगेत सोबत ठेवा.
5) ज्येष्ठमध
ज्येष्ठमध हा आणखी एक फायदेशीर घटक आहे जो मळमळ आणि अपचनापासून आराम देऊ शकतो. ते बारीक वाटून, पूड करून पाण्यात मिसळता येऊ शकते. तुम्ही ज्येष्ठमध पावडर चहामध्ये घालूनही पिऊ शकता. हर्बल टी आणि काढा प्यायल्यानेही मोशन सिकनेसचा त्रास कमी होतो, असे मानले जाते. या पेयांमध्ये सामान्यतः मसाल्यांचे पौष्टिक मिश्रण असते आणि त्यात कॅफिनचे प्रमाण फारच कमी असते.