हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग स्वयंपाक घरातल्या या एका पदार्थाचं करा नियमित सेवन, सर्व रोगांवर रामबाण इलाज

| Updated on: Nov 07, 2024 | 7:46 PM

हिवाळा आता काही दिवसातच सुरू होणार आहे, काही जणांना हिवाळा खूप आवडतो, मात्र हिवाळ्यात अनेक आजारांचा देखील सामना करावा लागतो.

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग स्वयंपाक घरातल्या या एका पदार्थाचं करा नियमित सेवन, सर्व रोगांवर रामबाण इलाज
Follow us on

हिवाळा आता काही दिवसातच सुरू होणारे काही जणांना हिवाळा खूप आवडतो कारण हा ऋतू उन्हाळ्यापासून दिलासा तर देतोच पण सोबत अनेक आव्हानेही घेऊन येतो. आरोग्याच्या अनेक समस्या हिवाळा ऋतूमध्ये निर्माण होतात. सर्दी खोकला ताप या आजाराने लहान मुलांपासून ते वयोवृद्ध हैराण होतात. अशा परिस्थितीमध्ये हिवाळा येण्यापूर्वी तुम्ही हळद आणि मधाचा वापर करू शकतात. तज्ञांच्या मते हळद आणि मध घेणे हिवाळ्यामध्ये फायदेशीर ठरेल.

पोषणतज्ञ नमामि अग्रवाल सांगतात की हिवाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती जेवढी जास्त वाढवता येईल तेवढी वाढवा. हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्वयंपाक घरातील हळद वापरू शकता. हळदीमध्ये अँटीव्हायरल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो जो संक्रमणाशी लढतो.त्यामुळे आयुर्वेदात हळदीला खूप महत्त्व आहे.

हळद आणि मध

प्राचीन काळापासून घरगुती उपचारांमध्ये हळद आणि मधाचा वापर केला जातो.तज्ञांच्या मते हिवाळ्याच्या आधी हळद आणि मध खाणे आवश्यक आहे. व्हायरल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियावर उपचार करण्यासाठी हळद फायदेशीर आहे.

हळदीमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती

हळद आणि मधामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. हे अँटिऑक्सिडंट तणाव आणि मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. एक चमचा हळद आणि मध खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे संसर्ग आणि फ्लू कमी करण्यास देखील मदत करते.

पचन संस्था मजबूत ठेवते

हळद आणि मध पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हळद आणि मध पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. बद्धकोष्टता आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर हळद आणि मध पिल्यास आराम मिळतो.

हृदय ठेवते निरोगी

हळद आणि मधाच्या नियमित सेवनाने ह्रदय निरोगी राहते. हळद हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली सुधारून एंडोथेलियल फंक्शन आणि रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून कार्य करते. कमी रक्तदाब असलेल्या लोकांसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे.