निरोगी हृदय हवंय तर इतके तास झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर , जाणून घ्या

| Updated on: Nov 04, 2024 | 8:18 PM

माणसाला दररोज रात्री नीट झोप येणे महत्वाचे असते. तर पुरेशी झोप झाली नाही तर आपण दिवस चांगला जात नाही.ताजेतवाने वाटत नाही. दिवसभर आळसावल्यासारखे वाटते. कोणत्याच कामात उत्साह राहत नाही. या संदर्भात तज्ज्ञांनी नेमकी किती तास झोप घ्यावी याची माहिती दिली आहे.

निरोगी हृदय हवंय तर इतके तास झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर , जाणून घ्या
Follow us on

आपल्या सर्वांना माहीतच आहे कि योग्य वेळी झोपणे आणि पुरेशी झोप घेणे हे उत्तम आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.यामुळे आपले शरीर आणि मेंदू चांगले कार्य करू शकतो. चांगली झोप घेतल्याने आपल्याला उत्साही आणि ताजेतवाने वाटते तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. पुरेशी झोप हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.संशोधनातून असे दिसून आले आहे की सात तासांपेक्षा कमी झोप हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढवते. स्त्रियांना पुरुषांपेक्षा याचा अधिक परिणाम होतो. निरोगी हृदय राखण्यासाठी सात ते आठ तास झोप आवश्यक आहे.झोपेची कमतरता, खराब जीवनशैली, तणाव आणि इतर समस्यांमुळे झोपेची समस्या निर्माण होते. योग्य झोपेसाठी आहार, जीवनशैली आणि तणावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

संशोधनाच्या अभ्यासानुसार ज्या लोकांची झोप ही सात तासांपेक्षा कमी असते त्यांचा आरोग्यावर परिणाम होतो आणि उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. विशेषत: आपल्या देशात स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमी झोप घेतात. अशा स्थितीत कमी झोपेमुळे महिलांच्या हृदयाच्या आरोग्यावर अधिक परिणाम होतो. संशोधनच्या अभ्यासानुसार असे दिसून येते कि सात तासांपेक्षा कमी झोपेमुळे उच्च रक्तदाबाचा धोका सात टक्क्यांनी वाढतो, तसेच ज्यांच्या झोपेचा कालावधी पाच तासांपेक्षा कमी असल्यास ११ टक्क्यांनी वाढू शकतो.

शास्त्रज्ञांच्या मते निरोगी हृदयासाठी सात ते आठ तासांची झोप सर्वोत्तम आहे. पण जर तुमच्या झोपेत वारंवार व्यत्यय येतोय तर याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब आणि नैराश्याचा धोका सुद्धा वाढतो. संशोधनाच्या अभ्यासानुसार ६ देशांतील १० लाखांहून अधिक लोकं कमी झोपेमुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त असल्याचे आढळून आले.

झोपेची कमतरता

– खराब जीवनशैली, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, रात्रभर मोबाईल आणि टीव्ही पाहण्याची सवय यामुळे लवकर झोप लागत नाही.

– अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे झोपेच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

– चिंता, नैराश्य, स्लीप एपनिया या समस्यांमुळेही तुमच्या हृदयाचा आरोग्यावर परिणाम होतो.

– रात्रीच्या वेळी जास्त खाणे आणि रात्रीच्या कामाच्या शिफ्टमुळे लोकांच्या झोपेच्या सवयी खराब होत आहेत.

झोप कशी सुधारायची

  • रात्री हलके अन्न खावे.
  •   रात्री धुम्रपान आणि मद्यपान करू नका.
  • रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि टीव्ही पाहू नका.
  • तणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
  • रात्री लवकर झोपण्याची सवय लावा.
  •  चांगली पुस्तके वाचा.