नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या नव्या विषाणूने शिरकाव केलाय. हा विषाणू ट्रिप म्युटंट असल्याचं समोर आलंय. त्याचाच परिणाम म्हणून देशभरात कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या नव्या कोरोना विषाणूचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय. महाराष्ट्रात नुकत्याच गेलेल्या जीनोम सिक्वेंसिंगमधून या नव्या विषाणूची आकडेवारी समजलीय. यानुसार नव्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये 60 टक्के रुग्ण या नव्या कोरोना विषाणूमुळे बाधित झाले आहेत.
भारतात आलेल्या या ट्रिपल म्युटंट कोरोना विषाणूचं नाव B.1.618 असं ठेवण्यात आलंय. याआधी डबल म्युटंट कोरोना विषाणू आला होता त्याचं नाव B.1.617 असं ठेवण्यात आलं होतं. हा नवा ट्रिपल म्युटंट कोरोना विषाणू अधिक धोकादायक मानला जातोय. हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला देखील चकवा देऊ शकतो. इतकंच नाही तर ज्यांना आधी कोरोना होऊन गेलाय आणि ज्यांच्या शरीरात कोरोना विषाणूंच्या विरोधातील अँटीबॉडीज तयार झाल्यात त्यांनाही या ट्रिपल म्युटंट कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.
पश्चिम बंगालमध्ये ट्रिपल म्युटंट कोरोना विषाणूचा वेगाने संसर्ग
हा धोकादायक ट्रिपल म्युटंट कोरोना विषाणू सध्या पश्चिम बंगालमध्ये वेगान पसरत असल्याचा इशारा संशोधकांना दिलाय. पश्चिम बंगालमध्ये या विषाणूचे सुरुवातीच्या सिक्वेन्स सापडल्या आहेत. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरु असल्याने आधीच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय. त्यात हा नवा धोकादायक विषाणू पसरत असल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.
जगभरात या नव्या विषाणूची स्थिती कशी?
नव्या कोरोनाशी मिळते जुळते विषाणू अमेरिका, स्विझर्लंड, सिंगापूर आणि फिनलंडमध्ये सापडले आहेत. ट्रिपल म्युटंटचा पहिला विषाणू भारताबाहेर 22 एप्रिल 2020 रोजी सापडला होता. असं असलं तर या विषाणूचा संसर्ग झालेल्या जगातील एकूण रुग्णांपैकी एकट्या भारतात 62.5 टक्के रुग्ण आहेत. यावरुनच या विषाणूचा भारतावरील हल्ला स्पष्ट होतो. संसर्गाबाबतचा हा अभ्यास outbreak.info येथ उपलब्ध आहे.
नव्या कोरोना विषाणूबाबतची आव्हानं काय?
CSIR-IGIB चे संशोधक डॉ. विनोद स्कारिया म्हणाले, “E484K प्रकारचा कोरोना विषाणू मानवी शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला चकवा देत संसर्ग करण्यात तरबेज आहे. या विषाणूचे जेनेटिक सेट्स जगातील अनेक कोरोना विषाणूंशी मिळते जुळते आहेत. विशेष म्हणजे E484K प्रकारचा कोरोना विषाणू प्लाझ्मा थेरपीनेही बरा होत नाहीये.”
B.1.618 – a new lineage of SARS-CoV-2 predominnatly found in India and characterized by a distinct set of genetic variants including E484K , a major immune escape variant. pic.twitter.com/dtfQJp2S2B
— Vinod Scaria (@vinodscaria) April 20, 2021
नवा कोरोना विषाणू कोरोना लसीवर कसा परिणाम करणार याबाबत अद्याप संशोधन होणं बाकी आहे. त्यासाठी कोरोना लस उत्पादक कंपन्यांना यावर सखोल संशोधन करावं लागणार आहे. यात नव्या कोरोना विषाणूचा काही परिणाम होणार का आणि झाला तर काय अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराचा शोध घ्यावा लागणार आहे.
हेही वाचा :
VIDEO : वर्षभरात कोरोना झाला नाही म्हणून सुपरमॅन समजू नका, मुंबईतील डॉक्टरचं कळकळीचं आवाहन
AIIMS मध्ये कोरोनाचा विस्फोट, 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण
साताऱ्यात एकाच गावात 241 कोरोना रुग्ण, संपूर्ण गाव चिडीचूप, घरटी एक रुग्ण
व्हिडीओ पाहा :
Increasing infection of Corona Virus triple mutant B1618 in Maharashtra and West Bengal