नवी दिल्ली : आजकाल जिथे पहावं तिथे खोकल्याचा (cough) कहर सुरूच आहे. सामान्यत: जेव्हा कोरोना शिगेला पोहोचला होता तेव्हा अशा तीव्र खोकल्याची समस्या जाणवली होती आणि लोकांमध्ये घबराट पसरली होती, पण आता अनेक लोकांना पुन्हा तोच त्रास (problem) जाणवू लागला आहे. हा कोरोनाचा एक प्रकार आहे की नवीन विषाणू (new virus) याबद्दल लोकांमध्ये संभ्रमांचे वातावरण आहे. मात्र या खोकल्याचा प्रत्येक चौथ्या किंवा पाचव्या व्यक्तीवर परिणाम होत आहे. हा असा खोकला आहे की एकदा सुरू झाला की थांबण्याचे नावच घेत नाही.
खोकता-खोकता लोकांच्या बरगड्या दुखू लागतात, श्वास घ्यायला त्रास होतो आणि घशात वेदनाही सुरू होतात. कधीकधी अनेक लोकांची संपूर्ण रात्र खोकण्यात घालवली जाते. ही अतिशय चिंतेची बाब आहे. कारण पूर्वी खोकला 5 ते 6 दिवसात बरा होत असे. पण यावेळेस खोकला पूर्णपण बरे होण्यासाठी महिना-महिना लागत आहे. पण यामागचे कारण काय आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? यावेळी सुरू झालेला खोकला इतका धोकादायक का आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? हा खोकला टाळण्यासाठी तुम्हाला कोणती तयारी करावी लागेल, तसेच हा व्हायरस आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.
खरंतर त्यामागे असा अदृश्य व्हायरस आहे. जो कोरोना नसला तरीही त्याची लक्षणे अगदी कोरोनासारखी आहेत. पण तुम्ही त्याला मिनी कोविड असेही म्हणू शकता. या व्हायरसचे नाव आहे इन्फ्लुएंझा A – H3N2 आहे. हा व्हायरस यावेळी देशातील अनेक शहरांमध्ये झपाट्याने पसरला असून दिवसेंदिवस त्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ICMR (Indian Council of Medical Research)ने देखील या विषाणूबाबत देशभरात सावधानता बाळगण्याचा इशारा दिला असून कोविडसारखी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण कोरोनाप्रमाणेच या विषाणूची लागण झालेल्या लोकांनाही खोकला आणि तापाची सर्वात मोठी समस्या जाणवत आहे.
– जवळपास 92 टक्के लोक असे आहेत ज्यांना इन्फ्लूएन्झा ए च्या या विषाणूमुळे ताप येतोय.
– 86% लोकांना असा खोकला जो एकदा सुरू झाल्यावर सतत येत आहे, थांबत नाहीये.
– 27% लोकांना खोकल्याबरोबर श्वास घेण्यासही त्रास होत आहे.
– तर 10 टक्के रुग्ण असे आहेत. ज्यांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे ऑक्सिजनची गरज होती.
– इन्फ्लूएंझा A – H3N2 ग्रस्त असलेल्या सात टक्के रुग्णांना ICU मध्ये दाखल करावे लागले.
खोकला आणि तापासाठी इन्फ्लूएंझा A ला मिनी कोविड का म्हटले जाते? तो धोकाही तुम्ही समजून घ्या.
– ज्या प्रकारे कोरोना थेट फुफ्फुसावर हल्ला करत होता, त्याचप्रमाणे या विषाणूमुळे फुफ्फुसात अत्यंत धोकादायक संसर्ग होत आहे.
– कोरोनाप्रमाणे इन्फ्लूएंझा ए नावाचा हा विषाणू देखील एकमेकांच्या संपर्कात येऊन वेगाने पसरतो.
– कोरोनाच्या अनेक प्रकरणांमध्ये डॉक्टर रुग्णांना बरे करण्यासाठी स्टिरॉइड्सचा वापर करत होते. त्याचप्रमाणे यावेळीही काही रुग्णांना बरे करण्यासाठी स्टिरॉइड्सची गरज भासत आहे.
– धोकादायक कोरोनाच्या काळात शहरातील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे या विषाणूमुळे रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे.
मात्र जेव्हा एखादी समस्या उद्भवते, तेव्हा त्यावर उपायही असतोच. कोरोनाच्या काळाप्रमाणेच आत्ताही काही खबरदारी घेऊन या विषाणूविरुद्ध लढता येऊ शकेल.
काय आहेत ICMR ची मार्गदर्शक तत्वं ?
– साबणाने वारंवार हात धुवा
– गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
– घराबाहेर पडताना मास्क वापरा.
– खोकताना आणि शिंकताना तोंड झाका
– हात धुतल्याशिवाय डोळे आणि तोंडाला स्पर्श करू नका
– खोकल्याची लक्षणे असल्यास गरम पाणी प्या आणि वाफ घ्या
– मीठ घालून कोमट पाण्याने गुळण्या करा
– ताप किंवा अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घ्या. मात्र वेळीच डॉक्टरांचा सल्ल घ्या व औषधे घ्या.
– जेव्हा तुम्हाला सर्वात प्रारंभिक लक्षणे दिसतात तेव्हा स्वतःला वेगळे करा
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)