लहान मुलांचे (Small babies) पालन-पोषण करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. मुलांचा योग्य विकास (kids’ growth) होण्यासाठी त्यांचा आहार हा महत्वाचा मुद्दा आहे. मुलांचे पोट नीट भरले आहे किंवा नाही, हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. लहान मुलं बोलू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना काय हवे हे नीट सांगता येत नाही. त्यांना पुरेसे दूध (milk) मिळत आहे की नाही, याचा अंदाज काही लक्षणे अथवा चिन्हांवरून तुम्हाला लावावा लागतो. नवजात बालके सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध सेवन करतात. त्यानंतर त्यांना हळूहळू घन पदार्थही देता येतात. दूध पिऊन बाळाच पोट बरले आहे की नाही हे समजण्यासाठी काही लक्षणांकडे नीट लक्ष द्यायला हवे, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. या विषयावर सविस्तर माहिती मिळावी यासाठी लखनऊमधील झलकारीबाई रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीपा शर्मा यांच्याशी संवाद साधला. त्यांनी महत्वाची माहिती दिली.
बाळाला भूक लागली असेल, तर त्याची चिडचिड होऊ लागते. तसेच त्यांचे डायपर जास्त ओले झाले नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की बाळ नीट दूध पित नाहीये.
दूध पिऊन झाल्यावर पोट नीट भरले असेल तर बाळ चांगले खेळते, ॲक्टिव्ह राहते. मात्र ते सुस्त असेल तर समजावे की त्याचे पोट नीट भरलेले नाही. मुलांच्या लघवीचा रंग जास्त पिवळा असल्यास मुलांना पुरेसं दूध मिळत नाही, असा अर्थ होतो.
लहान मुलांचे डोळे आणि तोंड कोरड वाटत असेल तर ते डिहायड्रेशनचे लक्षण असते. याचाच अर्थ असा की, बाळ पोटभर दूध पित नाहीये.
लहान मुलं किती वेळ दूध पितात, याचा त्यांच्या पोट भरण्याशी काहीही संबंध नसतो. बाळ दूध पिणं बंद करेल व त्याला थोडी झोप लागत असेल, तर त्याचे पोट भरले असे समजावे.
स्तनपान करता बाळाच्या दूध गिळण्याचा आवाज येत असेल तर समजावे की ते नीट दूध पित आहे. बाळाने दूध प्यायल्यानंतर तुम्हाला स्तन हलके वाटू लागतील.
जर मुलांचे वजन वाढत असेल, त्यांचा विकास नीट होत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. याचाच अर्थ असा की बाळाचे पोट नीट भरत आहे आणि ते व्यवस्थित दूध पीत आहे.
– जन्मापासून 2 महिन्यांपर्यंत नवजात मुलं रोज 8 ते 12 वेळा दूध पितात.
– म्हणजेच दर 2 ते 3 तासांनी मुलांना दूध हवे असते.
– 2 महिन्यांचे झाल्यानंतर लहान मुलं 3 ते 4 तासाने दूध पितात.
– चौथ्या महिन्यात मुलं 5-6 तासांनी दूध पितात.
– सहाव्या महिन्यात मुलं दर 6 ते 8 तासांनी दूध पितात. 6 महिन्यानंतर मुलांना अन्नपदार्थही देण्यास सुरूवात केली जाते. मुलांचा आहार बदलतो.
– मुलांना भूक लागल्याचे काही लक्षण दिसत नसेल तरी त्यांना वेळोवळी दूध पाजले पाहिजे.