गरोदरपणात हिमोग्लोबिन कमी होणे नॉर्मल असते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ..

| Updated on: Jan 25, 2023 | 9:53 AM

गरोदरपणादरम्यान, अनेक महिलांमध्ये कमी हिमोग्लोबिनची समस्या सुरू होते. जे आई आणि मूल दोघांसाठीही घातक ठरू शकते. त्याची कारणे आणि उपाय जाणून घेऊया.

गरोदरपणात हिमोग्लोबिन कमी होणे नॉर्मल असते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ..
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – आई होणे ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभूती असते, ज्यामध्ये ती प्रत्येक क्षण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अनुभवत असते. गरोदरपणात (pregnancy) स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यातील काही साधे तर काही सावध करणारे असतात. प्रत्येक महिलेमध्ये गरोदरपणातील समस्या (problems during pregnancy) वेगवेगळ्या असू शकतात. मात्र त्याची वेळीच दखल घेऊन ती लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गरोदरपणादरम्यान, अनेक महिलांमध्ये कमी हिमोग्लोबिनची (low hemoglobin) समस्या सुरू होते. त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो गंभीर त्रास ठरू शकतो.

हिमोग्लोबिन म्हणजे काय ते जाणून घ्या

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे एक आवश्यक प्रोटीन आहे, ज्याच्या मदतीने ऑक्सिजन रक्तापर्यंत पोहोचतो. अभ्यासानुसार, मुलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी 11 ग्रॅम DLअसावी. तर प्रौढ पुरुषांमध्ये त्याची पातळी 14 DLपर्यंत आणि स्त्रियांमध्ये 12 DLपर्यंत असावी. जर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन पातळी यापेक्षा कमी असेल तर ते आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे असू शकते.

हे सुद्धा वाचा

गरोदरपणात हिमोग्लोबिनची कमतरता का असते ?

डॉक्टरांच्या मते, गरोदरपणात हिमोग्लोबिन कमी होण्याचे एक साधे कारण आहे. ते म्हणजे गरोदरपणात रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्त पातळ होऊ लागते. त्याच वेळी, रक्त पातळ झाल्यामुळे, ते कमी होऊ लागतात. त्यामुळे हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. काही लोकांना असं वाटतं की गरोदरपणात लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होते. तर तज्ज्ञांच्या मते शरीरात लोह कमी असण्याचा गरोदरपणासी काहीही संबंध नसतो. रक्तातील प्लाझ्माचे प्रमाण वाढल्यामुळे RBC कमी होणे हे हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारण आहे.

ही आहेत हिमोग्लोबिन कमी झाल्याची लक्षणे

जेव्हा रक्तातील पाण्याची पातळी पोषक तत्वांच्या कमतरतेने वाढते, सहसा हिमोग्लोबिन कमी होऊ शकते. अशा स्थितीत शरीरात अशक्तपणा येणे, अनेकदा थकवा जाणवणे किंवा अशक्तपणा आणि ॲनिमिया अशी लक्षणे दिसतात.

नैसर्गिक पद्धतीने हिमोग्लोबिन वाढवता येऊ शकते का ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, शरीरात नवीन हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी शरीराला आयर्न म्हणजेच लोहाची गरज असते. कारण अत्यावश्यक पोषक तत्वे शरीरात आधीच उपलब्ध असतात. तज्ज्ञांच्या मते, नैसर्गिकरीत्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण लोहयुक्त अन्नाचे सेवन वाढवले ​​पाहिजे. यासाठी पालक, बथुआ, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचे भरपूर सेवन करू शकता. तर मांसाहार करणाऱ्या व्यक्ती मांस आणि चिकनचे सेवन करू शकतात. खजूर, अंजीर यासारख्या ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्यानेही शरीराला लोहाचा पुरवठा होतो. तसेच गूळ खाणे, लोखंडाच्या कढईत अन्नपदार्थ शिजवणे हेही चांगले उपाय ठरू शकतात.