Is It Okay To Eat Curd During Pregnancy : दही (curd) हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते बरेच फायदेशीर असेत असे तज्ज्ञ सांगतात. तसेच दही हे प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 यांचा खूप चांगला स्रोत आहे. पण गर्भवती स्त्रिया अनेकदा दह्याचा आहारात समावेश करण्यास टाळाटाळ करतात. अनेकांना असे वाटते की दही खाल्ल्याने बाळाचे नुकसान होऊ शकते. जर तुम्हालाही असाच संभ्रम वाटत असेल तर हे नक्की वाचा.
प्रेग्नन्सीमध्ये दही खाणे योग्य असते का ?
प्रेग्नन्सीमध्ये दही खाणे योग्य असते का ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याच उत्तर आहे ‘हो’.. गर्भावस्थेत दही हे हेल्दी डाएट आहे, असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाची नॅशनल हेल्थ अँड मेडिकल रिसर्च कौन्सिल देखील गर्भवती महिलांना त्यांच्या आहारात रोज दही समाविष्ट करण्याचा सल्ला देते. यानुसार गरोदरपणात दह्याचे सेवन केवळ सुरक्षितच नाही तर खूप फायदेशीर देखील असते. दही खाण्याचे काय फायदे असतात, ते जाणून घेऊया.
दही खाण्याचे फायदे –
– दही खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगले कार्य करते. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले बॅक्टेरिया शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून संसर्गाशी लढण्यास मदत करतात.
– प्रेग्नन्सी मध्ये मूड स्विंग्स आणि स्ट्रेस यापासून बचाव करण्यासाठी दह्याचे सेवन फायदेशीर समजले जाते. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक हे मूड सुधारण्याचे आणि चिंता दूर करण्याचे काम करते. तसेच नैराश्यासंबंधित लक्षणे दूर करण्याची क्षमताही दह्यामध्ये असते.
– गरोदरपणात बीपी किंवा ब्लड प्रेशर वाढण्याच्या समस्येमुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत दह्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले अँटी-हायपरटेन्सिव्ह इफेक्ट रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
– हाडं आणि स्नायूंना मजबूती मिळते. दह्यामध्ये असलेले प्रोटीन्स आणि कॅल्शिअम हे हाडं कमकुवत होण्यापासून बचाव करतात. तसेच स्नायू बळकट होण्यास मदत होते.
– प्रेग्नन्सीदरम्याम ॲसिडिटी आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही दह्याचे सेवन केले तर ते पचनाशी संबंधित समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)