मुंबई : हल्लीची लहान मुलं स्मार्ट झाली आहेत, असं आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं. इतकंच काय तर मोबाईलही काहीही न सांगता हाताळतात. पण काही चुकीच्या सवयी लागू नये म्हणून पालक लक्ष देऊन असतात. विचित्र गोष्टी करू नये यासाठी त्यांचं प्रबोधन केलं जातं. मोबाईल फोन हातातून काढून घेतला जातो. पण अनेकदा प्रेमान वागूनही मुलं चिडचिडेपणा करतात. कधी कधी रागाच्या भरात वस्तुंची तोडफोड करतात. असाच अनुभव कदाचित तुम्हालाही येऊ शकतो किंवा आला असेल. मुलाची चिडचिड पाहून तुम्हाला त्रास होतो. अनेकदा रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी लक्ष ठेवून असतात. पण कधी कधी मुलांमध्ये विटामिन बी 12 ची कमी असल्याने असं होऊ शकतं.
विटामिन बी 12 शरीराच्या न्यूरोलॉजिकल हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी आवश्यक आहे. या विटामिनची कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम मुलांच्या वागण्यावर पडतो. त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो. चला जाणून घेऊयात विटामिन बीची कमतरता कशी होते आणि त्याची लक्षणं काय आहेत.
डॉक्टरांच्या मते, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती तसेच जंक फूडचं जास्त सेवन केल्याने त्याचा परिणाम दिसून येतो. काही प्रकरणात जेनेटिक कारणांमुळे मुलांमध्ये विटामिन बी 12 ची कमतरता असू शकते.
न्यूरोसर्जन डॉक्टर राजेश कुमार यांनी सांगितलं की, “विटामिन बी 12 चं प्रमाण कमी झाल्यानं न्यूरोलॉजिकल हेल्थवर परिणाम दिसून येतो. त्यामुळे कायम थकवा जाणवतो. तसेच भूक कमी होऊ शकते. त्यामुळे काही मुलांचा स्वभाव चिडचिडा होतो.” अशी लक्षणं तुमच्या मुलांमध्ये दिसली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच त्याच्या खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रीत करा.
काही प्रकरणांमध्ये जेनेटिक कारणामुळे विटामिन बी 12 ची कमतरता असू शकते. त्यामुळे त्यांची रक्त तपासणी करू शकता. यामुळे मुलाच्या शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता आहे की नाही ते कळेल. जर खरंच कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं किंवा सप्लिमेंट घेऊन ती उणीव भरून काढू शकता.
मुलांच्या आहारात दूध, अंडी आणि माशांचा समावेश करून विटामिन बी 12 ची उणीव भरून काढली जाऊ शकते. जर तुम्ही मासांहार करत नसाल तर भाज्या आणि त्या त्या सिझनमधघ्ये उपलब्ध असलेली फळ घेऊन ही कमी दूर करू शकता.