किडनी स्वस्थ ठेवायची असेल तर खा ही सुपरफूड्स

| Updated on: Jan 03, 2023 | 4:39 PM

किडनी स्वस्थ ठेवण्यासाठी हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश जरूर केला पाहिजे. काही सुपरफूड्सचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.

किडनी स्वस्थ ठेवायची असेल तर खा ही सुपरफूड्स
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – किडनी (kidney) आपल्या शरीरातील एक महत्वपूर्ण अवयव आहे. ही शरीरात अनेक प्रकारची कामं करते. शरीरातील टाकाऊ घटक (waste) आणि अतिरिक्त द्रव पदार्थ बाहेर काढण्याचे काम किडनी करते. एका प्रकारे किडनी ही अशुद्धता फिल्टर करण्याचे कार्य करते. पण याच किडनीची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्याचा सामना करावा लागू शकतो. अनेक लोकांना किडनीशी संबंधित समस्या (kidney problem) शेवटी कळतात, मात्र तोपर्यंत किडनी खराब होते. अशा परिस्थितीमध्ये किडनीची पूर्ण काळजी घेणे गरजेचे असते.

किडनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करणे महत्वाचे ठरते. तुम्हालाही किडनीचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर काही सुपरफूड्स तुम्ही रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता.

लाल सिमला मिरची

हे सुद्धा वाचा

लाल सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए तसेच व्हिटॅमिन बी 6, फॉलिक ॲसिड आणि फायबर हे मुबलक प्रमाणात असतात. त्याच्या सेवनामुळे किडनी निरोगी राहते. तसेच लाल सिमला मिरची खाल्याने दृष्टी चांगली राहते.

लसूण

लसणाचा वापर भारतीय स्वयंपाकघरात सर्रास केला जातो. लसूण अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरला जातो. लसणामध्ये मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे पोषक घटक असतात. ते किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात. यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात.

कांदा

कांदा पदार्थांना सोडियम फ्री फ्लेव्हर देण्याचे काम करतो. कांद्याचे सेवन केल्याने किडनीही निरोगी राहते. आपण अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये कांद्याचा वापर करू शकता.

सफरचंद

सफरचंदामध्ये पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन्स आणि झिंक यांसारखे पोषक घटक आढळतात. ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच ग्लुकोजची पातळी राखण्यासही मदत करतात. सफरचंद खाल्याने किडनी निरोगी राहते.

फ्लॉवर

फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. फ्लॉवर हे फोलेट आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्याच्या वापराने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे किडनी निरोगी राहण्यास मदत होते.

मुळा

मुळ्याचे सेवन करणे हे किडनीच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये पोटॅशिअम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि सी हेही असते.