मुंबई : माझ्या मनात तुला दुखावण्याचा हेतू नव्हता. तुझा काही तरी गैरसमज होतोय. माझ्या मनात दुसरंच काहीतरी होतं, पण मी वेगळंच काही तरी बोलून गेले, असं आपण बऱ्याचदा म्हणतो. हे सगळं आपल्या इतकं सवयीचं झालंय की आपल्याला त्याचं काहीच नवल वाटत नाही. पण जर तुमच्या बाबतीत हे वारंवार घडत असेल तर सावधान… तुम्ही एका गंभीर आजाराचे शिकार असू शकता. तो आजार आहे, अॅफेसिया (Aphasia). हा आजार नेमका काय आहे, याबद्दल जाणून घेऊयात…
अॅफेसिया म्हणजे काय?
अॅफेसिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे. यात तुमचा मेंदू संवाद साधण्याची क्षमता गमावतो. त्याचा परिणाम व्यक्तीचं बोलणं, लिहिणं आणि समजण्याच्या क्षमतेवर होतो. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार काही गोष्टींच्या बाबतीत आपण विचार एक करतो आणि वागतो भलतंच, असं वाटत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांशी बोला. गरज पडल्यास योग्य उपचार घ्या.
मेंदू शब्द समजण्यास सक्षम आहे परंतु मेंदू ते शब्द जिभेवर पाठवू शकत नाही जेणेकरून ते शब्द बोलू शकतील. या आजारात माणसाच्या मनात बरोबर विचार येतो, पण अनेक वेळा योग्य शब्द समजत नाही आणि मग तो शब्द बोलण्यात अडचण येते. त्याचप्रमाणे, जेव्हा लोक काही बोलत असतात तेव्हा त्यांना भाषा समजणे कठीण होतं. हा एक गंभीर आजार असून तो व्यक्तीच्या विचार आणि बोलण्यावर परिणाम करतो.
हॉलिवूड अभिनेता ब्रूस विलिस यालाही हा आजार झाला होता. हॉलिवूडमध्ये तब्बल 40 वर्षे काम केल्यानंतर ब्रूस विलिसने अभिनयातून निवृत्ती घेतली आहे. याचं कारण ब्रुस विलिसला झालेला अॅफेसिया आजार. ब्रूस विलिसला अॅफेसिया हा आजार झाला आहे. त्यामुळे तो हॉलिवूडची रजा घेत आहे, असं त्याच्या कुटुंबाकडून इस्टाग्रामवर सांगण्यात आलं होतं. तेव्हापासून लोकांमध्ये या आजाराबाबत अधिक चर्चा सुरू झाली.
संबंधित बातम्या