नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या नवऱ्यापेक्षा फेसबुक आणि तुमच्या स्मार्टफोनकडे (smartphone) जास्त लक्ष देता का ? तुम्ही शरीरसंबंध किंवा सेक्स टाळत आहात का ? एखादी मोठी खरेदी केली तर ती जोडीदारापासून लपवता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘नाही’ असं असेल तर उत्तम, पण तुमचं उत्तर ‘होय’ असं असेल तर वेळीच सावध व्हा. तुमच्या अशा वागण्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनाला (married life) धक्का बसू शकतो व क्वचित तडा जाऊन भविष्यात गंभीर परिणामही होऊ शकतात. पण वाईट सवयींची जाणीव झाली की त्या बदलायला कधीच उशीर होत नाही. नातेसंबंधातील सर्वात वाईट चुका (bad habits in relationship) कोणत्या व त्या कशा टाळता येतील हे समजून घेणे महत्वाचे ठरते.
1) कोणत्याही गोष्टीचे व्यसन लागणे
सोशल मीडिया, अन्न, दारू, ड्रग्ज, खरेदी किंवा जुगार – यापैकी कोणत्याही स्तरावरील व्यसनामुळे वैवाहिक जीवन लवकर बिघडू शकते. तुमचे व्यसन हे पटकन तुमच्या वैवाहिक जीवनातील तिसरी व्यक्ती बनते, असे कॅलिफोर्निया येथील मॅरेज व फॅमिली थेरेपीस्ट लिसा बहार यांनी नमूद केले. अशा गोष्टी करून तुम्ही तुमच्या जोडीदाराची फसवणूक करत आहात असे तुम्हाला वाटत असेल तर ते खरंच तसे असते. यापासून वाचायचे असेल तर तुमची बेडरूम डिव्हाइस-फ्री झोन बनवा आणि इंटरनेटवर वेळ घालवण्यासाठी ठराविक वेळेची मर्यादा (स्वत:ला) घालून घ्या. जेवतानाही मोबाईलचा वापर करणे बंद करा.
2) शरीरसंबंध / सेक्स करणे टाळणे
लैंगिक संबंध का कमी झाले आहेत किंवा ते टाळण्यासाठी एखादी सबब सांगण्याची वाईट सवय तुम्हाला लागली असेल, तर तुमचे वैवाहिक जीवन अडचणीत येऊ शकते. लैगिंक संबंध हे एकमेकांशी जोडले राहण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. जेव्हा तुमचा जोडीदार सेक्सबद्दल विचारतो तेव्हा “नाही” म्हणण्यपेक्षा जास्त वेळा “हो” म्हणण्याचा प्रयत्न करा. ऑर्गॅजम्समुळे आणि निरोगी शारीरिक स्पर्शामुळे पुरुष व स्त्रियांना कामोत्तेजनामुळे अनके आरोग्य आणि मानसिक फायदे होतात, अनेक अभ्यासातून समोर आले आहे. 10 सेकंद किंवा त्याहून अधिक काळ मिठी मारल्याने रक्तदाब कमी होतो आणि शरीरातून ऑक्सीटोसिन हा फील-गुड हार्मोन रिलीज होतो तर तणावाच्या हार्मोन्सची पातळी कमी होते, अशी माहितीही समोर आली आहे.
3) संवादाचा अभाव
तुमच्या प्रत्येक संवादाचे वादात किंवा भांडणात रुपांतर होते का ? तुम्हाला जे हवे आहे ते मागायला शिकण्यासाठी चांगला संवाद साधणे महत्वाचे ठरते. समोरच्या व्यक्तीने तुमचे मन वाचावे अशी अपेक्षा करू नका, असे फॅमिली थेरेपीस्ट लिसा बहार यांनी नमूद केले. तसेच अस्पष्ट विधाने आणि एखादी गोष्ट गृहीत धरणे टाळा, मनात जे असेल ते स्पष्टपणे बोला. “एकमेकांचे ऐकायला शिकणे खूप महत्वाचे आहे, परंतु ते करणे आश्चर्यकारकपणे खूप कठीण असू शकते,” असे थेरेपिस्ट शिनबॉम यांनी नमूद केले.
यासाठी एक प्रयोग करून पहा – एकमेकांच्या समोर बसा. एका जोडीदारावे बोलावे व समोरच्याने काहीही प्रतिसाद न देता, मध्ये न बोलता फक्त ऐकून घ्यावे. नंतर समोरच्याने जे सांगितले ते पुन्हा सांगायचा प्रयत्न करावा. बोलणाऱ्या जोडीदाराला नक्की काय सांगायचे आहे, काय मत मांडायचे आहे हे समजण्यासाठी काही वेळेस 10 वेळा प्रयत्न करावे लागतात, असे शिनबॉम यांनी सांगितले.
4) जोडीदाराला शत्रू मानू नका
तुमचा दिवस वाईट गेला हे तुमच्या जोडीदाराशी भांडण करण्याचे कारण ठरू शकत नाही. तुम्ही जेव्हा विचित्र मन:स्थितीत असाल तेव्हा त्याबददल जागरुक रहा आणि (जोडीदाराकडून) थोडा वेळ मागून घ्या किंवा स्वत:ची काळजी घेण्याचा वेगळा मार्ग शोधा. ती तुमची जबाबदारी आहे. पण हे वारंवार (विचित्र मन:स्थिती) होत असेल तर नक्की काय चुकतंय याता शोध घ्या आणि काय सुधारणे करणे गरजेचे आहे, तेही समजून घ्या.
Why Marriages Succeed or Fail (Simon & Schuster) या पुस्तकाचे लेखक जॉन गॉटमॅन यांनी दोन दशकांत 2,000 विवाहित जोडप्यांचा अभ्यास केला. त्यांना असे आढळले की तिरस्कार, टीका आणि बचावात्मकता ही शेवटी घटस्फोटाला कारणीभूत ठरते. तुमची देहबोली किंवा शब्द यांतून तुमचा जोडीदार काय म्हणतो ते नाकारू नका, तो किंव ती काय सांगते, हे ऐकून घ्यायला शिका.
2013 साली UC बर्कलेच्या अभ्यासानुसार, खराब झोपेमुळे जोडप्यांना त्यांच्या भागीदारांच्या गरजांबाबत कमी आत्मियता वाटल्याचे व (जोडीदारांबद्दल) कृतज्ञता व्यक्त करण्याची शक्यता कमी झाल्याचे दिसून आले. यामध्ये 18 ते 56 वर्षे वयोगटातील 60 पेक्षा जास्त जोडप्यांचा अभ्यास करण्यात आला होता.
5) पैशांबद्दलचे मत
पैशाबद्दल प्रेम वाचणे हे सर्व वाईटाचे मूळ असू शकते, परंतु त्यावर वाद घालणे हे अनेक वैवाहिक समस्यांचे मूळ आहे. कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटीच्या 2013 च्या अभ्यासानुसार, पैशांवरून भांडणे हे घटस्फोटासाठी कारणीभूत ठरू शकते. 4,500 हून अधिक जोडप्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, पैशाबद्दल वाद घालताना अनेक जोडपी कठोर भाषा वापरता व त्यावरून झालेल्या संघर्षातून सावरण्यासाठी जास्त वेळ लागतो.
आर्थिक नियोजन हे वैवाहिक समुपदेशनाचा भाग असावा आणि कोणत्याही जोडप्याने लग्न करण्यापूर्वी त्यांचे क्रेडिट रिपोर्ट शेअर करावेत, अशी शिफारस संशोधकांनी केली आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे असते. खर्चाविषयी एकमेकांशी बोलणे हे वैवाहिक जीवनात खूप महत्वाचे ठरते.
6) तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका
तुम्ही तुमचे आई-वडील किंवा भावंडांच्या जवळ असलात तरीही, तुमच्या प्राधान्यक्रमांच्या बाबतीत एक ठराविक रेष आखा. जेव्हा तुम्ही लग्न करता, तेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे कुटुंब सुरू करता – आणि मग तेथे तुमचा जोडीदार प्रथम येतो. यामध्ये तुमच्या जोडीदाराबद्दल किंवा लग्नाबद्दल तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना खासगी माहिती सांगणे किंवा त्यांची बाजू घेणे याचा समावेश असतो. लग्न झाल्यावर तुम्ही व तुमचा जोडीदार हे प्राथमिक कुटुंब बनते. एकमेकांचे पालक आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सीमा कशा सेट करायच्या यावर चर्चा करा. जर तुमच्या कुटुंबांची शैली आणि परंपरा भिन्न असतील, तर आधी एकमेकांशी बोला, मग एकजूट दाखवा.
तुमचे मित्र किंवा कामात खूप वेळ घालवत असाल आणि तुमच्या जोडीदाराला तुमच्या सोबत जास्त वेल हवा असेल तर त्याला प्राधन्य द्या. मुलांसमोर जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका.
7) न्यायाने लढा
तुम्ही एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यावर काम करण्यापेक्षा, त्याबद्दल तक्रार करण्यात जास्त वेळ घालवता का? तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात अपरिहार्यपणे काही मतभेद असू शकतात. पण तुम्ही ते मतभेद कसे सोडवता, यावर तुमच्या नात्याचे भविष्य ठरते. एकतर त्यामुळे तुमचे नाते घट्ट होईल किंवा ते तुटेल. तुमची (बोलण्याची ) वेळ आणि आवाज याकडे लक्ष द्या (शक्यतो आवाज चढवू नका.) परस्पर आदर आणि विश्वास प्रतिबिंबित करणारे मूलभूत नियम स्थापित करावेत.
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, तर ती गोष्ट खरंच एवढी महत्वाची आहे का, हे स्वतःलाच विचारा. ते खूप महत्वाचे असेल तर ते बोलून टाका व मोकळे व्हा. काही मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करा.
– दरवेळेस योग्य किंवा बरोबर होण्याचा प्रयत्न करू नका; त्याऐवजी, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा
– तुमच्या जोडीदाराचा दृष्टिकोन विचारात घ्या
– एका वेळी एक समस्या सोडवा
– सध्याच्या भांडणात मागील समस्या उकरून काढू नका.
– वैयक्तिक हल्ले आणि टीका करणे टाळा
– अपराधीपणा, धमक्या आणि इमोशनली ब्लॅकमेल करणे यासारख्या युक्त्या वापरू नका
– वाद किंवा मतभेदानंतर एकमेकांना टाळू नका.
8) छोट्या छोट्या गोष्टींचा विसर पडणे
प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची, शाबासकीची एखादी थाप, जवळीक हवी असते. सर्वांनाच आपुलकी आवडते. तुमच्या जोडीदारालाही तुमच्याकडून ती अपेक्षा असते. त्यामुळे आपल्या जोडीदाराबद्दल प्रेम व्यक्त करणे, आपुलकी दर्शवणे याकडे दुर्लक्ष करू नका. एखादी हलकीशी मिठीसुद्धा समोरच्या व्यक्तीला सुखावू शकते.
यशस्वी विवाहासाठी दररोज दयाळूपणाची कृती महत्त्वाची असते. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी मिठी मारणे, हलकेसे चुंबन घेणे, या कृती कायम करत रहा, त्यातून समोरची व्यक्ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे हे दिसून येते. जोडीदाराला काही हवे नको ते पाहमे, एखादे छोटेसे ( महागच हवे असे काही नाही) गिफ्ट देणे, शेजारी बसलेले असताना खांद्यावर हात ठेवणे, थँक्यू म्हणणे, या कृतीतून प्रेम व्यक्त होते.