Mucormycosis : म्युकरमायकोसिसची भीती वाटतेय? मग ICMR ने सुचवलेल्या ‘या’ गोष्टी कराच…

| Updated on: May 10, 2021 | 4:32 AM

सध्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचं प्रमाण वाढलंय.

Mucormycosis : म्युकरमायकोसिसची भीती वाटतेय? मग ICMR ने सुचवलेल्या या गोष्टी कराच...
या लोकांसाठी ब्लॅक फंगस अधिक घातक
Follow us on

मुंबई : सध्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचं प्रमाण वाढलंय. ज्या रुग्णांमध्ये डायबिटीस आहे किंवा आयसीयूमध्ये अधिक काळ थांबलेले असताना काळजी घेतली नाही अशा रुग्णांमध्ये याचं प्रमाण अधिक असल्याचं केंद्र सरकारने सांगितलंय. तसेच म्युकरमायकोसिसपासून संरक्षण करण्यासाठी कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासावी असं सांगण्यात आलंय. बुरशीविरोधी, प्रतिजैविक औषधांचा वापर फार विचारपूर्वक केला पाहिजे, असंही नमूद करण्यात आलंय. एकूणच म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने सविस्तर गाईडलाईन्सचं जारी केल्यात. त्याचा हा आढावा (Know all about how to prevent Mucormycosis post COVID discharge).

या गोष्टींमध्ये काळजी घेतली नाही तर म्युकरमायकोसिसचा धोका

म्युकर मायकोसिस हा आजार बुरशीचा संसर्ग आहे. जे लोक मोठा काळ आपल्या इतर आजारांचा उपचार घेत आहेत त्यांची वातावरणातील रोगजंतूंशी लढण्याची क्षमता कमी होते. अशावेळी या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. श्वासोच्छवासाद्वारे हे जंतू नाकातून फुफुसात पोहचतात.

म्युकरमायकोसिसची लक्षणं काय?

डोळे किंवा नाक किंवा दोन्हींच्या आजूबाजूला लालसरपणा आणि वेदना होणे
ताप
डोकेदुखी
खोकला
दम लागणे
रक्ताच्या उलट्या
तणाव

काय काळजी घ्याल?

जर धुळ असलेल्या ठिकाणी किंवा बांधकामाच्या ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर करा.
मातीत काम करण्याआधी बूट, लांब पँट आणि लांब बाह्यांचा शर्ट आणि हातात ग्लोव्ह्ज घाला.
व्यक्तिगत स्वच्छता पाळा त्यासाठी संपूर्ण शरीर घासून अंघोळ करा.

म्युकरमायकोसिस झाल्याचा संशय कधी घ्यावा?

नाकबंद होणे, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणे, गालाचं हाड दुखणे
चेहऱ्याच्या एका बाजूने दुखणे, सूज येणे
दात दुखणे, दात हलणे किंवा पडणे, जबडा दुखणे
अंधुक दिसणे, डोळे दुखणे, वेदना होणे
छाती दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास होणे

काय करावं?

पायपरग्सुसेमिया (Hypeglucemia) नियंत्रित करणे
कोविडमधून बरं झाल्यावर आणि डायबेटीस असल्यावर रक्तातील ग्लुकोजची पातळीवर लक्ष ठेवा
योग्य वेळ, योग्य डोस आणि कालावधीप्रमाणे स्टेरॉईड घ्या
ऑक्सिजन थेरपी घेताना स्वच्छ आणि उकळलेलं पाणी वापरा
बुरशीविरोधी आणि अँटी बायोटिक काळजीने वापरा

काय करु नये?

लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
कोरोनानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेलं असताना नाकबंद झालेल्या सर्वच रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचं समजू नका.
बुरशीचा संसर्ग झालाय की नाही याचा शोध घेण्यासाठी सखोल तपासण्या करा.
म्युकरमायकोसिसचा संशय आल्यानंतर किंवा तसं स्पष्ट झाल्यानंतर औषधोपचार घेण्यासाठी उशीर करु नका.

नियंत्रण कसं मिळवाल?

साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवा
स्टेरॉईड्सचा वापर कमी करा
रोगप्रतिकारक औषधं थांबवा
बुरशीविकोधी औषधाची गरज नाही
शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बुरशीजन्य भाग काढणे
4-6 आठवडे बुरशीविरोधी उपचार
शरीरातील पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा
रुग्णाची बारकाईने वैद्यकीय चाचणी करा.

कुणाशी संपर्क साधाल?

मायक्रोबायोलॉजिस्ट
न्युरोलॉजिस्ट
ईएनटी स्पेशालिस्ट
ऑप्थॅमोलॉजिस्ट
डेंटिस्ट
सर्जन
बायोकेमिस्ट

हेही वाचा :

पैसे नसतानाही उपचारासाठी धडपड, रुग्णालयातूनच इंजेक्शनची चोरी, नातेवाईकांना अश्रू अनावर

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?

Mucormycosis : गुजरातमध्ये 500 कोरोना रुग्णांना ‘म्युकर मायकोसिस’, 20 जणांचे डोळे निकामी, तर 10 जणांचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

Know all about how to prevent Mucormycosis post COVID discharge