वर्धा : “मागील वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात झाला आहे. दरम्यानच्या कालावधीत कोरोनासाठी अनेक औषधींचा प्रायोगिक उपयोग झाला. त्यामध्ये रेमडेसिवीर हे मुख्य औषध आहे. पण, ते औषध प्रभावशाली ठरल्याचे सिद्ध झालेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालात ही बाब सिद्ध झाली आहे. गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्यांना रेमडेसिवीरचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात,” असे मत वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालचे अधीक्षक डॉ. एस. कलंत्री यांनी व्यक्त केले (Know all about special Sevagram pattern to treat corona without Remdesivir).
डॉ. कलंत्री म्हणाले, “रेमडिसीवर देऊन मृत्यूदर, दवाखान्यातील जाण्याची वेळ, व्हेंटीलेटरवर जाण्याची वेळ टळत नाही. कोरोनाबद्दल भिती निर्माण झाली आहे. कोरोनाकरीता रेमडीसीवर म्हणजे संजीवनीच चित्र निर्माण झाले आहे. मात्र हे औषध रामबाण असल्याची भावना शास्त्रीय दृष्टीकोनातून योग्य नाही. सेवाग्राम रुग्णालयात शास्त्रीय दृष्टीकोनातून औषधी देताना विचार केल्या जातो. रेमडीसीवरचा गाजावाजा झाला आहे. त्यात आशेच स्थान निर्माण झाले आहे. भितीमुळे रेमडीसीवरचा काळाबाजार, तुटवडा होत आहे. सौम्य आजार, ऑक्सिजनची कमी नसलेल्यांना सेवाग्राम रुग्णालयात रेमडेसिवीर देत नाही. ज्यांना खरच फायदा होईल, त्यांनाच रेमडीसीवर रिजर्व केले आहे.”
“अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झाले”
“अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झाले असल्याचा अनुभव आहे. रेमडेसिवीर देण्यापूर्वी किडनी, लिव्हर चांगले असणे आवश्यक आहे. लिव्हर खराब असेल, किडनी काम करत नसेल, डायलिसीस लागत असेल, ट्रान्सप्लँट झालेले असेल, गंभीर स्वरूपाचे हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर दिल्याने तोटे होतात, प्रतिकूल परिणाम होतात. हृदयावरही प्रतिकूल प्रभाव होत असल्याचे पेपर प्रसिद्ध झाले आहेत. सर्वांगीण विचार करुन रेमडेसिवीर द्यायला हवे,” असंही डॉ. कलंत्री यांनी सांगितलं.
“10 दिवसांचा कोर्स केल्यास 30 टक्के मृत्यूदर कमी”
“कोरोनाकाळात अनेक औषधांचा प्रयोग होत आहे. सौम्य लक्षण असलेल्यांनाही अनेक औषधी देतात. ऑक्सिजन पातळी कमी झालेल्यांना, दवाखान्यात आलेल्यांना स्टिरॉईड म्हणजे डेक्सामिथासोन प्रभावी आहे. दहा दिवसांचा कोर्स केल्यास 30 टक्के मृत्यूदर कमी होतो. डेक्सामिथासोन, टॉसीलीझीमॅप आणि चांगली काळजी घेतली तर इतर औषधींचा प्रभाव दिसत नाही. भितीमुळे अशी परिस्थिती निर्माण असावी. उपचार पद्धती शास्त्रीय असायला हवी,” असंही डॉ. कलंत्री यांनी नमूद केलं.
जिल्ह्यात मागील 15 दिवसात आलेला रेमडेसिवीरचा साठा आणि कोणत्या रुग्णालयाकडून किती वापर झाला याचा आढावा खालीलप्रमाणे,
16 मार्चपासून रुग्णालय निहाय वापरण्यात आलेले इंजेक्शन
जिल्ह्यात सर्वाधिक सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयात रुग्ण असताना सुद्धा सेवाग्राम येथे रेमडीसीवर इंजेक्शन वापरण्यास टाळल्या जात आहे
हेही वाचा :
कोरोनाचे नियम मोडताय, दंड न भरल्यास प्रशासन थेट मालमत्तेवर बोजा चढवणार
व्हिडीओ पाहा :