नवी दिल्ली : साखर हा मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णाचा सर्वात मोठा शत्रू म्हणून पाहिले जाते. या कारणास्तव, मधुमेहाच्या रुग्णांना त्यांचा चहा किंवा मिठाईमध्ये गोडवा (sweetness) आणण्यासाठी मध, गूळ यासारखे पर्याय शोधावे लागतात. पण ते खरोखरच आरोग्यदायी पर्याय आहेत का असा प्रश्न पडतो? आहारात मधाचा (honey in diet) समावेश करणे हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खरोखरच चांगला पर्याय आहे का, ते जाणून घेऊया.
मधुमेह हा मेटाबॉलिज्मशी निगडीत एक विकार आहे. आहारावरील निर्बंध आणि शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करणे हे मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याच्या सर्वात महत्वाच्या पैलूंपैकी एक आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आपल्या आहारात मुख्यतः 3 प्रमुख मॅक्रोन्यूट्रिएंट्स असतात – कर्बोदके, चरबी आणि प्रथिने. मधुमेहासाठी आहार व्यवस्थापना कार्बोहायड्रेट्सना प्रतिबंध करणे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे.
मधुमेहींसाठी मध खरोखरच आरोग्यदायी आहे का?
पांढऱ्या साखरेच्या तुलनेत, मधामध्ये ग्लुकोजपेक्षा जास्त फ्रॅक्टोज असते, जे दोन्ही प्रकारच्या साखरेचे समान भाग असतात. 1 चमचा मधामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण पांढऱ्या साखरेपेक्षा जास्त असते. मधाचा फायदा म्हणजे पांढर्या साखरेपेक्षा कमी ग्लायसेमिक शिखर आहे. तुमच्या आहारात गोडवा येण्यासाठी तुम्ही कमी प्रमाणात मध वापरू शकता, त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर कमी होईल.
संयत प्रमाणात वापर केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारू शकते असे एका डेटामधून सुचवण्यात आले आहे. मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्याने मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते उपयुक्त ठरू शकते. मात्र, पांढर्या साखरेऐवजी मधावर स्विच करण्यासाठी ही शिफारस करण्याआधी अधिक विस्तृत संशोधन आवश्यक आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी काळजीपूर्वक निरीक्षण करून मधाचे माफक प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे.
एकंदरीत लोक काय खातात आणि किती खातात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपल्याकडे मधाबाबत निर्णायक अहवाल येत नाहीत तोपर्यंत तो कमी प्रमाणात, मर्यादित प्रमाणातच सेवन करणे चांगले ठरते.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)