नवी दिल्ली – थंडीच्या दिवसांत विविध खाद्यपदार्थांची (winter food) रेलचेल असते. गार वातावरणात वेगवेगळे पदार्थ खायला मजाही येते. लाडू, गुळाची चिक्की, गजक याशिवाय हा हंगाम अपूर्ण राहतो. थंडीच्या दिवसांत दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर लाडू, हलवा, चिक्की आणि गजक हे नक्कीच खावेत. तीळ, गूळ, तूप आणि ड्रायफ्रूट्सचा वापर या गोष्टींमध्ये केला जातो, ज्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. प्रत्येक ऋतूमध्ये गुळाचे (jaggery) सेवन फायदेशीर ठरते. गुळात अनेक पोषक घटक असतात, जे तुम्हाला थंडीत उबदार (warm) ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती (boosts immunity) देखील वाढते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, परंतु अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की गूळ फुफ्फुसांना निरोगी ठेवण्याचे काम करतो.
थंडीच्या दिवसात गुळाचे सेवन करण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया
1) दमा नियंत्रित करतो
एका अभ्यासानुसार, गूळ हा फुफ्फुस, पोट, आतडे, घसा आणि आपली श्वसनसंस्था स्वच्छ करण्याचे काम करतो. त्यामुळे प्रदूषण आणि धुळीपासून वाचायचे असेल तर रोज गुळाचा एखादा तुकडा तरी नक्की खावा.
2) थंडीत ऊब देतो
जर तुम्ही हिवाळ्यात गूळ खाल्ला तर मेटाबॉलिज्म वाढते, ज्यामुळे शरीर उबदार राहते. तसेच रक्त प्रवाहही सुधारतो.
3) मायग्रेनवर आहे गुणकारी
मायग्रेनचा त्रास असेल तर गुळाचे सेवन केल्याने फायदा मिळतो. त्यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅंगनीज, झिंक आणि सेलेनिअम यांसारख्या खनिजे भरपूर असतात, जे मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम देण्यास फायदेशीर ठरते.
4) खनिजांचा खजिना आहे गूळ
गुळामध्ये फॉस्फरस, कॅल्शिअम, लोह आणि व्हिटॅमिन-बी यांचे मुलबक प्रमाण असते. त्याशिवाय त्यामध्ये मॅग्नेशिअमही असते ज्यामुळे मज्जासंस्था मजबूत होते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)