नवी दिल्ली – सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी (breakfast) खूप महत्त्वाचा आहे. शरीरासाठी पौष्टिक आहार जेवढा आवश्यक आहे, तेवढेच महत्वाचे आहे वेळेवर खाणे. सकाळी उठून आवरणे, ऑफीसला जायची गडबड या सगळ्या नादात अनेक लोकं नाश्ता करायला विसरतात. तर अनेकांना सकाळचा नाश्ता करण्याची सवयच नसते. अशा स्थितीत व्यस्त जीवनशैली आणि खाण्याच्या योग्य सवयींचा (busy lifestyle and unhealthy food habits) अभाव यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. बर्याचदा घरातील वडीलधारी मंडळी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असल्याचे सांगतात. काही खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. पण सकाळचा नाश्ता करणं का गरजेचं आहे किंवा जेवल्यानंतरच घराबाहेर पडण्यामागचं कारण काय आहे, याबद्दल लोकांना नीट माहिती नाही. सकाळी पोटभर नाश्ता करण्याचे काय फायदे (benefits of breakfast) आहेत, ते जाणून घेऊया.
सकाळी नाश्ता करण्याचे फायदे
निरोगी हृदयासाठी महत्वाचा ठरतो नाश्ता
एका अभ्यासानुसार, नाश्ता वगळल्याने तुमचे वजन जास्त वाढू शकते. जास्त वजन किंवा लठ्ठपणा असल्याने उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे निरोगी हृदय हवे असेल तर नाश्ता करणे विसरू नका.
टाइप-2 मधुमेहाचा धोका होतो कमी
नियमित नाश्ता केल्याने मधुमेहापासून अंतर राखता येते. एका अभ्यासानुसार, जे लोक नियमित नाश्ता करतात त्यांना मधुमेहाचा धोका जवळपास 30% कमी होतो.
ऊर्जेची पातळी वाढवते
नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. पौष्टिक आहार घेऊन सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर शारीरिक हालचालींमध्ये वाढ होते. लवकर भूक लागत नाही आणि दिवसभर भरपूर ऊर्जा राहते. तसेच गतिशील राहिल्याने वजन नियंत्रणात राहते आणि थकवा येत नाही
स्मृती सुधारते
पौष्टिक नाश्ता करून दिवसाची सुरुवात केल्याने एकाग्रता वाढू शकते आणि स्मरणशक्ती वाढू शकते. मेंदूच्या निरोगी कार्यासाठी कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात. अशा स्थितीत उच्च दर्जाचा नाश्ता केल्याने तणाव कमी होऊन मन शांत राहू शकते.