नवी दिल्ली – झोप ही आपल्या आरोग्यासाठी (sound sleep) अतिशय आवश्यक गोष्टींपैकी एक आहे. जर तुम्हाला झोप येत नसेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. असे असले तरी, तुम्ही विवस्त्र झोपल्यास (sleeping without clothes) कपडे घालून झोपण्यापेक्षा जास्त फायदे होतात हे तुम्हाला माहीत आहे का ? वास्तविक, 10% पेक्षा कमी अमेरिकन लोक विवस्त्र झोपतात. विवस्त्र झोपणे हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने आश्चर्यकारक (benefits of sleeping without clothes) आरोग्य फायदे देते.
विवस्त्र झोपल्याने काय होते ?
1) त्वचेची दुरुस्ती प्रक्रिया सुधारते
तुम्ही विवस्त्र झोपल्यास त्वचा अधिक सहजतेने दुरुस्त होते. सेबेशियस ग्रंथी या पूर्ण क्षमतेने कार्य करतात आणि त्वचा अधिक जलद पोषक द्रव्ये शोषून घेते. तसेच, शरीराचा मेटाबॉलिज्म सुधारते.
2) वेदना कमी होतात
विवस्त्र झोपल्याने रक्ताभिसरण उत्तेजित होते आणि वेदना कमी होतात. विशेषत: पोटाच्या भागातील वेदना कमी होतात आणि अधिक आराम मिळतो व चांगली झोप लागते.
3) एनर्जी / उर्जा वाढते
रात्री विवस्त्र झोपल्याने चांगली झोप लागते व परिणाम तुमची उर्जेची पातळी किंवा एनर्जी वाढते. यामुळे तुम्हाला दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळण्यास मदत होते.
4) अधिक फ्रिस्की वाटते
स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट वाढतो त्यामुळे ऑक्सिटोसिन सारखे बाँडिंग हार्मोन्स वाढतात आणि यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या स्पर्शाबाबत अधिक संवेदनशील होता. तसेच, यामुळे विश्वास, कनेक्टिव्हिटीची भावना मजबूत होते.
5) वजन कमी करण्यास प्रोत्साहन मिळते
विवस्त्र झोपण्यामुळे, कोर्टिसोलची पातळी वाढते आणि त्यामुळे केवळ चांगली झोप लागत नाही तर वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला देखील चालना मिळते. वजन कमी करायचे असेल तर हा उत्तम उपाय ठरतो.
6) बॅक्टेरिया प्रतिबंधित करते
विवस्त्र झोपल्याने यीस्ट आणि बॅक्टेरियाची वाढ रोखता येते. तसेच, यामुळे घामाचे डाग कोरडे होतात आणि शरीराला आराम मिळतो.
7) झोप सुधारते
कपडे घालून झोपण्यापेक्षा विवस्त्र झोपणे हे चांगल्या झोपेसाठी चांगले असते. शरीराचे तापमान कमी होते आणि जर तुम्ही कपडे घातलेले असतील तर झोपेचे चक्र विस्कळीत होते. त्यामुळे झोप डिस्टर्ब होते आणि तुम्ही रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहता व नीट झोप लागत नाही. विवस्त्र झोपल्यास झोपेची गुणवत्ता वाढते व लहान बळासारखी शांत व गाढ झोप लागते.