नवी दिल्ली – चालणे हा मेटाबॉलिज्म (metabolism) वाढवायचा सर्वात सोपा उपाय आहे. 8 किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने चालल्यास (walking) अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे (आपण) केवळ 10 मिनिटे चालल्यानेही शरीराला (benefits to body) फायदा मिळतो. दररोज 60 मिनिटांपर्यंत चालल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. तज्ज्ञांनी याबद्दल काय सांगितले आहे ते जाणून घेऊया.
10 मिनिटे चालणे : साखर नियंत्रणात राहते.
नियमितपणे 10 मिनिटे चालल्याने फास्टिंग आणि पोस्ट मील (जेवणापूर्वी व जेवणानंतर) ब्लड ग्लूकोजमध्ये सुधारणा होते. रात्री भोजनानंतर चालल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. टाइप-2 मधुमेहावर नियंत्र ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी 5000 पावलं चालले पाहिजे. त्यापैकी 3000 पावलं ब्रिस्क वॉकिंग केलं पाहिजे.
20 मिनिटे चालणे : वृद्धत्वाची प्रोसेस कमी वेगाने होते
दररोज 20 मिनिटे जलद चालल्याने मायटोकॉन्ड्रियाच्या कार्यप्रणालीमध्ये वेगाने सुधारणा होते. मायटोकॉन्ड्रिया हे शरीर व शरीरातील विविध अवयवांना 90% उर्जा प्रदान करते. यामुळे वृद्धत्वाची प्रोसेस कमी वेगाने होते. ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह या हृदयासाठी धोकादायक ठरणाऱ्या घटकांमध्ये सुधारणा होते.
30 मिनिटे चालणे : इम्युनिटी वाढते
शरीराची सुरक्षा करणारे इम्यून सेल बी-सेल, टी-सेल आणि किलर सेलची ॲक्टिव्हिटी वाढते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चालताना पेशी आकुंचन व प्रसरण पावतात, त्यामुळे पायांच्या नसांवर दाब पडतो. यामुळे शरीराच्या विविध अवयवांपर्यंत होणारा रक्तप्रवाह सुधारतो.
40 मिनिटे चालणे : ताण कमी होतो
जर 4.5 किमी प्रतितास या वेगाने 40 मिनिटे वेगाने चालल्यास कार्टिसोल हे स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते तसेच मेलेटोनिन या झोपेच्या हार्मोनची पातळीही वाढते. यामुळे चांगली झोप लागते. तणाव कमी होतो. तसेच स्नायूही मजबूत होतात.
50 मिनिटे चालणे : वजन वेगाने कमी होते
जर 6 किमी प्रति तास या वेगाने चालल्यास 50 मिनिटांमध्ये 80 किलोंची व्यक्ती 350-400 कॅलरीज बर्न करू शकते. दररोज जेवणातून घेतल्या जाणाऱ्या कॅलरीजमधून जर 500 जास्त कॅलरी बर्न केल्या तर महिन्याभरात सुमारे 1.5 वजन कमी करता येऊ शकते.
60 मिनिटे चालणे : आयुर्मान वाढते
दररोज 60 मिनिटांपर्यंत चालल्याने मेंदू आणि नर्व्ह दोन्ही शांत होऊन छोटे-छोटे विचार करण्याची क्षमता वाढते. यामुळे व्यक्ती रणनीतिक रुपाने समृद्ध होते, ज्यामुळे क्रिएटीव्हिची वाढते. 60 मिनिटांचा वॉकमुळे शरीराच्या जवळपास सर्व अवयवांना फायदा मिळतो ज्यामुळे आपले आयुर्मान वाढते.