लो-कॅलरी, व्हिटॅमिनयुक्त असतात तिळाचे लाडू, खाल्याने हे 5 आजार होतील दूर

| Updated on: Jan 14, 2023 | 5:27 PM

हिवाळ्याच्या दिवसात तिळाचे लाडू खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तीळ, गूळ आणि शेंगदाण्यांपासून बनणारे हे लाडू खूप पौष्टिकही असतात.

लो-कॅलरी, व्हिटॅमिनयुक्त असतात तिळाचे लाडू, खाल्याने हे 5 आजार होतील दूर
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – मकर संक्रांत (makar sankranti) आणि लोहरी सारख्या सणांदरम्यान खाण्या-पिण्याची खूप रेलचेल असते. आजही, भारतातील बहुतांश घरांमध्ये, लोक सणासुदीच्या काळात पारंपारिक पद्धतीने तिळगूळ (til laddu), खिचडी व इतर पदार्थ बनवून खातात. हिवाळ्याच्या दिवसात तिळाचे लाडू खाणे आपल्या आरोग्यासाठी (benifits of eating til ladu) खूप फायदेशीर असते. हे लाडू अतिशय आरोग्यदायी असून त्यात अनेक जीवनसत्वं असतात.

तीळ आणि गूळ घालून तयार केलेले लाडू हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्याचे काम करतात. शरीराला बरे करण्यासोबतच तिळापासून शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या हिवाळ्यात तीळ खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या.

तिळाच्या लाडवामध्ये अनेक पोषक तत्वं

हे सुद्धा वाचा

तिळात लोह, प्रथिने, व्हिटॅमिन बी आणि ई आढळतात. हे सर्व घटक डोळे, यकृत आणि इतर अवयवांसाठी फायदेशीर आहेत. तुम्ही काळ्या किंवा पांढर्‍या तिळाचे लाडू तयार करू शकता. तीळ हे हेल्दी सुपरफूड आहे आणि या कारणास्तव त्याचे तेलही सेवन करता येते. तिळगुळामध्ये वापरण्यात येणाऱ्या गुळामुळे आपले रक्ताभिसरण सुधारते. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, गुळामुळे त्या प्रसरण पावतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. हे लो कॅलरी फूड असल्याने वजन कमी करणारे लोकही त्याचे सेवन करू शकतात.

तिळगूळाच्या सेवनाने हे 5 आजार राहतील दूर

1) हिवाळ्यात तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच खोकला आणि सर्दीपासून सुरक्षित ठेवतात.

2) या लाडवांमध्ये कॅल्शिअम असल्यामुळे हाडं मजबूत होतात व हाडांच्या दुखण्याचा त्रास होत नाही.

3) बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या लोकांनी हिवाळ्यात तिळाचे लाडू जरूर खावे, कारण त्यात फायबरदेखील असते.

4) तिळाचे लाडू हे ऊर्जा देण्यासाठी प्रभावी आहे. तसेच दम्याच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहेत.

5) हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक येतो. अशा परिस्थितीत तिळाचे सेवन केले पाहिजे कारण त्यातील घटक आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतात.