Diabetes prevention Tips : हृदयविकार (heart disease) आणि कर्करोगाप्रमाणेच (cancer) मधुमेहाच्या रुग्णांमध्येही (diabetes patients) देशात दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. हा रोग होण्यामागे अनेक कारणे आहेत. खराब अन्न, विस्कळीत जीवनशैली आणि अनुवांशिक समस्या या गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरतात. पण झोपेची कमतरता देखील तुम्हाला मधुमेहाचे रुग्ण बनवू शकते हे तुम्हाला माहीत आहे का ? डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना रोज चांगली झोप लागते, त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. या विषयावर संशोधनही करण्यात आले आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठात 500 लोकांच्या झोपण्याच्या पद्धतीवर संशोधन करण्यात आले आहे. त्यामध्ये असे आढळून आले की जे लोक रोज आठ तास झोप घेतात, त्यांच्या शरीरात पॅरा सिंथेटिक खूप सक्रिय राहते. त्याच्या सक्रियतेमुळे, साखरेची पातळी ठीक राहते आणि आपल्या शरीराचे संतुलन राखण्यास देखील मदत होत असते. या संशोधनात असेही दिसून आले की जे लोक चांगली झोप घेतात, त्यांच्या झोपतात शरीरातील इन्सुलिनची प्रतिक्रिया देखील वाढते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते आणि शुगर लेव्हल वाढत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज कमीत कमी आठ तासांची झोप घेतली पाहिजे.
चांगल्या झोपेसाठी रोज करा व्यायाम
ज्येष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, चांगली झोप येण्यासाठी चांगली जीवनशैली असणेही खूप महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही रोजच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश केला पाहिजे. दिवसभरात कमीत कमी १५ मिनिटे तरीय व्यायाम करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे.
हलका व्यायाम म्हणून तुम्ही वेगाने चालणे, सायकल चालवणे, दोरीवरच्या उड्या मारणे आणि जॉगिंग अशा अनेक पर्यायांचा अवलंब करू शकता. असे केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि तुम्हाला रात्री चांगली झोपही लागते. त्यामुळे साखरेची पातळीही नियंत्रणात राहील आणि मधुमेहाचा धोकाही कमी होईल.
आहाराची घ्या काळजी
चांगल्या लाइफस्टाइलसोबतच जेवणही चांगल्या झोपेसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी रात्री जास्त अगदी पोटभर न जेवण्याचा प्रयत्न करा. रात्री चहा किंवा कॉफीचे सेवन करणे टाळा. झोपण्याच्या किमान दोन तास आधी रात्रीचे जेवण करावे. तसेच जेवल्यानंतर लगेचच झोपू नका. थोडा वेळ चालावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)