Headache Reason : वारंवार होणारी डोकेदुखी ठरू शकते धोकादायक, त्यामागे असू शकतात ही गंभीर कारणं..

| Updated on: Aug 24, 2023 | 2:29 PM

जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या वारंवार सतावत असेल तर ती सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. कारण ही चिंताजनक बाब असू शकते.

Headache Reason : वारंवार होणारी डोकेदुखी ठरू शकते धोकादायक, त्यामागे असू शकतात ही गंभीर कारणं..
Image Credit source: freepik
Follow us on

Reasons Of Headache : आजकाल ताण-तणाव आणि चिंता (stress or anxiety) यासह अनेक कारणांमुळे बहुतांश लोकांना डोकेदुखीचा (headache) त्रास होत असतो. त्यामागे एकच ठोस असे कारण नाही, पण अनेक कारणांमुळे डोकं दुखू शकतं. पण बरचसे लोकं हे डोक दुखणं हे सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात. मात्र वारंवार डोकं दुखणं हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण देखील असू शकते. तणाव किंवा चिंता, क्लस्टर डोकेदुखी, मायग्रेन आणि सायनस यामुळेही डोकं दुखू शकतं.

जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या वारंवार सतावत असेल तर ती सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. कारण ते धोकादायक आणि चिंताजनकही असू शकते. वारंवार डोकं दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

डोकेदुखीची कारणे

  1. तणाव आणि चिंता : जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल किंवा तणाव असेल तर त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. कारण या दोन्ही घटकांमुळे डोकेदुखीचा त्रास होतो.
  2. अपुरी झोप : जर तुम्हाला चांगली आणि पूर्ण झोप मिळाली नाही तर डोकेदुखीचा त्रास होणे स्वाभाविक आहे. अपुऱ्या झोपेमुळे बरेच त्रास होऊ शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे अनेकदा लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या दिसून येते.
  3. डिहायड्रेशन : डिहायड्रेशन हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते. त्यामुळे शरीरात कधीही पाण्याची कमतरता भासू देऊ नये. दिवसभरात भरपूर पाणी, द्रव पदार्थ पीत राहा.
  4. डोळ्यांवर ताण: लॅपटॉपवर काम करणे किंवा मोबाईल स्क्रीन जास्त वेळ पाहणे यामुळे देखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि दीर्घकाळ डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला लॅपटॉपवर बराच वेळ काम करावे लागत असेल, तर ब्लू-रे प्रोटेक्टिव चष्मा नक्कीच वापरावा.
  5. सायनस : दीर्घकाळ किंवा वारंवार डोकेदुखी हे सायनस इन्फेक्शन किंवा क्रॉनिक सायनुसायटिसचे लक्षण असू शकते.
  6. हार्मोनल बदल : हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. म्हणूनच आपला आहार निरोगी ठेवावा आणि नियमित व्यायाम करावा.
  7. कॅफेन : जर तुम्ही चहा किंवा कॉफीचे भरपूर सेवन करत असाल तेही डोकेदुखीचे कारण ठरू शकते. त्यामधील कॅफेनमुळे डोकेदुखी वाढू शकते. म्हणूनच चहा, कॉफी प्रमाणात प्यावी. सारखे सेवन करणे चांगले नाही.
  8. औषधांचा अतिवापर : ओव्हर-द-काउंटर अर्थात सहज मिळणारी, वेदना कमी करणारी औषधे घेऊन, त्यांचा अतिवापर करूनही डोकेदुखी होऊ शकते.
  9. इतर कारणे : मायग्रेन, उच्च रक्तदाब किंवा ब्रेन ट्यूमर यांसारख्या आजारांमुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे, जर तुमचं डोकं वारंवार दुखत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)