तुम्हालाही आहे का घोरण्याची सवय ? असू शकते या गंभीर समस्येचे लक्षण

| Updated on: Dec 29, 2022 | 12:28 PM

आपल्यापैकी बऱ्याच जणांना रात्री झोपताना घोरण्याची सवय असते. मात्र आपण नेमकं का घोरतो हे माहीत आहे का?

तुम्हालाही आहे का घोरण्याची सवय ? असू शकते या गंभीर समस्येचे लक्षण
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – साधारणत: घोरण्याच्या सवयीला गाढ झोपेचे (sleep) लक्षण मानले जाते. तुम्ही हे बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की घोरणारी (snoring) व्यक्ती खूप गाढ झोपली आहे. पण जर तुम्ही झोपेत घोरत असाल तर ते चांगलं नसतं, हे तुम्हाला (snoring is bad for health) माहीत आहे का ? ते एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. झोपेत घोरणाऱ्या व्यक्तीला माहीतच नसते की ती व्यक्ती घोरत आहे. जे लोक झोपेत घोरतात, त्यांना बऱ्याच वेळेस जाग आल्यानंतर तोंड आणि गळ्यात जळजळ होण्याची समस्या जाणवते.

घोरण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आपण नक्की का घोरतो, हे जाणून घेऊया.

घोरण्याची अनेक कारणे असू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, घोरणे हा श्वासोच्छवासाच्या स्थितीत अडथळा असतो, जो बऱ्याच वेळेस नाक आणि घशात दिसून येतो. लठ्ठपणा, जास्त धूम्रपान व मद्यपान करणे, निद्रानाश किंवा नाकातील ॲलर्जी इत्यादी कारणांमुळे घोरण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

घोरणे कधी धोकादायक ठरू शकते ?

तज्ज्ञांच्या मते, घोरताना श्वास थांबला तर ती धोकादायक स्थिती असू शकते. जर तुम्ही दिवसा झोपतानाही घोरत असाल तर ही गंभीर समस्या असू शकते.

ही आहेत घोरण्याची लक्षणे

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तुम्हाला दिवसभर आळस किंवा थकवा जाणवत असेल तर हे देखील घोरण्याचे लक्षण असू शकते. तणाव, जास्त झोप येणे, डोकेदुखी इत्यादी घोरण्याची लक्षणे असू शकतात.

घोरण्याची सवय कशी सोडवावी ?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आपली लाईफस्टाईल आणि आहारात बदल करून वजन कमी करावे. जर तुम्हाला सायनस किंवा थायरॉईडचा त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)