तुम्हालाही गरमागरम अन्न जेवायची सवय आहे का ? हे पदार्थ वारंवार गरम करणे ठरते नुकसानकारक

| Updated on: Feb 07, 2023 | 3:32 PM

तुम्हालाही गरम जेवण खायला आवडते का, त्यासाठी तुम्हीही अन्न पुन्हा पुन्हा गरम करता का? तसे असल्यास, वारंवार अन्न गरम करण्याचे परिणाम जाणून घ्या.

तुम्हालाही गरमागरम अन्न जेवायची सवय आहे का ? हे पदार्थ वारंवार गरम करणे ठरते नुकसानकारक
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – गरमागरम अन्न जेवणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जर तुम्ही अन्न वारंवार गरम (reheat food) केलेत तर त्याचे पौष्टिक मूल्य (Nutrition) कमी होत जाते. काही वेळा त्याचा जेवणाच्या चवीवरही (taste of food) परिणाम होतो. आपल्यापैकी बहुतांश लोक जेवण गरम करूनच खातात. तुम्हीही असे करत असाल तर आत्ताच सावध व्हा. पुढील वेळी, मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्यापूर्वी, त्याचे परिणाम जाणून घ्या. तसेच कोणते पदार्थ पुन्हा गरम करू नयेत (Foods you should never reheat), हेही समजून घ्या. हे पदार्थ वारंवार गरम केल्यास ते नुकसानकारक ठरू शकते.

काय सांगतात तज्ज्ञ ?

आहारतज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही एखादी भाजी वारंवार गरम केली तर त्यात असलेले तेलही अनेक वेळा गरम होते. जे ट्रान्सपॅचसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे शरीरातील पोषक तत्वांची उपलब्धता कमी होते. त्याचा परिणाम हृदयावर आणि पचनसंस्थेवर दिसून येतो. अशावेळी अन्न शिजवल्यानंतर लगेचच खावे, जेणेकरून शरीराला त्याचे फायदे मिळू शकतील. ते वारंवार गरम करू नये.

हे सुद्धा वाचा

अंडी, चिकन व मशरूम

अंडी, चिकन आणि अगदी मशरूम हे सर्व प्रोटीन पॉवरहाऊस आहेत परंतु आपण ते शिजवताच ते प्रोटीन खराब होऊ लागतात. विशेषतः चिकन, त्याची प्रोटीन रचना अशा असते, ज्यामध्ये लाल मांसापेक्षा जास्त प्रथिनांचे प्रमाण असते, ते दुसर्‍यांदा गरम झाल्यावर बदलते. या सर्वांमुळे तुमच्या पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पडतो.

शिजवलेला भात अथवा तांदूळ

शिजवलेल्या भातामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. ज्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. अशा स्थितीत भात पुन्हा गरम करायचा असेल तर लक्षात ठेवा की तो हवाबंद डब्यात चांगला साठवून ठेवावा. जर तुम्ही सामान्य तापमानात भात ठेवला, तर बॅक्टेरिया खूप लवकर वाढू लागतात. ही समस्या टाळण्यासाठी तांदूळ कमी प्रमाणात शिजवा आणि शिजवल्यानंतर गरम असतानाच लगेच खा.

व्हिटॅमिन बी आणि सी होते नष्ट

व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले अन्न परत गरम केले तर त्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतील. अशा परिस्थितीत पेरू, लिंबू, संत्री, कीनू हे पदार्थ शिजवणे चुकीचे आहे. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले लिंबू हे स्वयंपाक करताना पदार्थांमध्ये पिळणे टाळावे. जेवण तयार करताना त्यात लिंबाचा रस टाकल्यास जेवणाची चव तुरट होऊ शकते. पोहे बनवत असाल तर पोहे तयार झाल्यानंतर त्यावर लिंबू पिळून घ्या. दुसरीकडे, व्हिटॅमिन बी समृद्ध अन्न म्हणजे दही, हे शिजवणे पूर्णपणे चुकीचे आहे. तसेच पनीरची कोणतीही भाजी करताना ग्रेव्ही शिजल्यावर त्यामध्ये पनीर घालावे व ते नंतर शिजवू नये.