नवी दिल्ली – हिवाळ्याच्या ऋतूत वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जाणारे हिरवे मटार (green peas) हे प्लांट-बेस्ड प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहेत. मटार खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास नुकसानही (side-effects) होऊ शकते. हे खरं आहे. मटार हे पोषक तत्वांनी युक्त आहेत, त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर असतात. तसेच त्यामध्ये कोलीन, रिबोफ्लेविन सारखे कंपाऊंडही असतात, जी खराब कोलेस्ट्रॉल (cholesterol) कमी करतात.
मात्र कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केल्यास त्याने नुकसान होऊ शकते. मटाराचेही तसेच आहे. प्रमाणाबाहेर मटार खाल्ल्यास आपले नुकसान होऊ शकते. आरोग्यासंदर्भात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मटाराच्या अतिसेवनामुळे होणारे नुकसान
व्हिटॅमिनचा स्तर
मटारामध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म, रक्तातील कॅल्शिअमची पातळी आणि पेशींमध्ये ऊर्जा पातळी वाढून रक्त गोठण्याचा धोका वाढू शकतो. व्हिटॅमिन के हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते, पण हाय युरिक ॲसिड, रक्त गोठणे आणि थ्रोम्बोफ्लिबिटिस यासारख्या समस्या असतील तर मटार खाऊ नयेत.
लठ्ठपणासाठी ठरते कारणीभूत
हिरवे मटार हे प्लांट-बेस्ड प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहेत, मात्र हे लक्षात न घेताच लोक मटाराचे खूप सेवन करतात. खूप जास्त मटार खाल्याने वजन वाढू शकते., त्यामुळे ठराविक प्रमाणातच मटार खावेत.
ब्लोटिंग आणि गॅसेस
आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मटारामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते, जे बऱ्याच वेळेस ब्लोटिंग आणि गॅसेस साठी कारणीभूत ठरू शकते. मटारामधील साखर पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे पचनाचे विकार होतात.
संधिवाताचा होऊ शकतो त्रास
मटारामध्ये प्रोटीन्स, अमिनो ॲसिड व्हिटॅमिन डी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. मात्र त्याशिवाय कॅल्शिअमची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे शरीरात युरिक ॲसिड वाढून गाऊटचा भयानक त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत मटाराचे सेवन करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
अँटी-न्यूट्रिएंट्स युक्त
मटारामध्ये फायटिक ॲसिड आणि लॅक्टिन सारखी पोषक तत्व असतात, मात्र त्यामुळे इतर अनेक पोषक द्रव्ये शोषून घेण्यात अडथळा निर्माण होतो. मटाराचा हा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे, ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते आणि ते कुपोषणास कारणीभूत ठरू शकते. लोक याकडे लक्ष न देता कितीही प्रमाणात मटार खातात. तसेच जास्त प्रमाणात मटार खाल्ल्याने वजन वाढू शकते, त्यामुळे एका ठराविक प्रमाणातच मटार खावेत.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)