नवी दिल्ली : कडक, रणरणत्या उन्हाळ्याचा (hot summer) ऋतू सुरू झाला असून अशा तापत्या उन्हातून घरी आल्यावर काहीतरी गार, थंड प्यावसं वाटतं. अशा वेळी एक ग्लासभर लिंबू पाणी (lemon water)प्यायल्याने शरीर थंड राहण्यास खूप मदत होते. लिंबू पाणी तुम्हाला उन्हाळ्यात डिहायड्रेशन आणि वारंवार तहान लागण्याच्या समस्येपासून वाचवते. आता कडक उन्हाळा आला आहे. कडक उन्हातही शरीराला थंड ठेवण्याऱ्या अशा खाण्या-पिण्याच्या पदार्थांसाठी लोक आता सरसावतील. लिंबू पाणी प्यायल्याने झटपट उर्जा (energy) मिळते आणि उष्णतेपासून काही प्रमाणात आराम मिळतो यात शंका नाही, पण जर तुम्ही याचे अति प्रमाणात सेवन केले तर शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात.
लिंबू व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत मानला जातो, जो शरीरातील इतर रोगांशी लढण्यास मदत करतो. मात्र कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन करणे धोकादायक आहे. लिंबू पाण्याचे जास्त सेवन केल्याने तुमच्या शरीरावर किती वाईट परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊया.
जास्त लिंबू पाणी पिण्यामुळे होणारे नुकसान
1) पोटाचे आजार : रिकाम्या पोटी लिंबूपाणी मधात मिसळून प्यायल्याने पचनास खूप मदत होते. तथापि, जास्त प्रमाणात लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते आणि पचन प्रक्रिया देखील मंद होऊ शकते, ज्यामुळे पोटदुखीच्या तक्रारी होऊ शकतात.
2) डिहायड्रेशन प्रॉब्लेम : लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने तुमचे ब्लॅडर फुगू शकते, याचा अर्थ तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागेल. शरीरातून जास्त पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळेच लिंबू पाणी प्यायल्यानंतर भरपूर पाणी प्या, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही.
3) दात किडणे : लिंबाचा रस खूप आम्लयुक्त अर्थात ॲसिडीक असतो आणि तो जास्त प्रमाणात प्यायल्याने दातांना झिणझिण्या येऊ शकतात. तसेच वेळेनुसार, या झिणझिण्या वाढू शकतात, ज्यामुळे दात किडतात. तुम्हाला तुमच्या दातांमध्ये संवेदनशीलतेची समस्या असल्यास, तुम्ही लिंबासारख्या नैसर्गिकरित्या आम्लयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित केले पाहिजे.
4) केस होतात खराब : लिंबाचा केसांवरही वाईट परिणाम होतो. लिंबू थेट केसांना लावल्याने वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे तुमचे केस कोरडे होऊ शकतात आणि अकाली पांढरे होऊ शकतात. लिंबामध्ये ॲसिडीक अर्थात अम्लीय गुणधर्म असतात, जे तुमच्या केसांचे पोषण चोरू शकतात. म्हणूनच केसांना थेट लिंबू लावणे टाळावे.
5) मायग्रेन : मायग्रेनच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्यांनी नेहमी लिंबाचे जास्त सेवन करणे टाळावे. लिंबू आणि इतर लिंबूवर्गीय फळांमुळे मायग्रेनची गंभीर समस्या उद्भवते.