नवी दिल्ली – सध्याचे जीवन अतिशय धावपळीचे आणि व्यस्त असून त्यामुळे अनेक लोक (busy schedule) आजाराच्या गर्तेत सापडतात. वाईट जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. कामाच्या वाढत्या दबावामुळे लोकांना बऱ्याच वेळेस शांतपणे जेवायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत लोक फास्ट फूडकडे (fast food / junk food) जास्त आकर्षित होत आहेत. पिझ्झा, बर्गर, मोमोज असे अनेक पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. पिझ्झा (pizza) तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो. ऑर्डर केला की अवघ्या अर्ध्या तासात घरी येणारा हा पिझ्झा सर्वजण आवडीने खातात. तो चविष्ट तर असतचो, पण तो सतत खाल्ल्यास काही दुष्परिणामही दिसून येतात. आपल्या आरोग्याचेही मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हालाही पिझ्झा खूप आवडत असेल तर त्याच्या दुष्परिणामांबद्दलही जाणून घ्या.
वजन वाढते
तुम्हाला जो पिझ्झा खायला खूप आवडतो, तो बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. मैदा आपल्या आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतो, हे तर सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत पिझ्झा देखील आपल्यासाठी खूप हानिकारक ठरतो. त्यामध्ये जीवनसत्त्वे, फायबरसारख्या पोषक तत्वांची कमतरता असते, त्यामुळे पिझ्झा खाल्ल्याने वजन वाढू शकते.
हृदयरोगाचा धोका
पिझ्झा चविष्ट व्हावा यासाठी त्यात भरपूर चीज वापरले जाते, पण त्यामुळे आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते. अशा परिस्थितीत पिझ्झा सतत खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो. त्यामुळे पिझ्झा जेवढा कमी खाऊ तेवढेच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
ब्लड प्रेशर वाढू शकते
सतत खूप पिझ्झा खाल्ल्याने हायपरटेन्शनचा त्रासदेखील होऊ शकतो. खरंतर, सतत पिझ्झा खाल्ला तर आपल्या शरीरातील सोडिअमचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
रक्तातील साखरेची पातळी बिघडू शकते
पिझ्झाचे सतत सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळीही बिघडू शकते. पिझ्झाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत हे खूप धोकादायक ठरू शकते.
ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो
पिझ्झा बनवताना त्यामध्ये मैदा, चीज, प्रिझर्व्हेटिव्ह टाकलेला यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे या पदार्थांच्या अतिसेवनामुळे तुम्हाला ॲसिडिटीचाही त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होत असेल, तर पिझ्झा, बर्गर असे मैदायुक्त पदार्थ न खाणेच चांगले ठरते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)