नवी दिल्ली : उन्हाळा सुरू झाला असून आता हळूहळू कडाक्याचे ऊन (hot summer) वाढू लागेल. वाढत्या गरमीमुळे सगळेच हैराण होतात आणि गारव्यासाठी पर्यायही शोधू लागतात. उन्हाळ्याच्या ऋतूमुळे आपल्या जीवनशैलीत बरेच बदल होतात. या ऋतूत पोशाखापासून खाण्यापर्यंत सर्व काही बदलते. एवढेच नाही तर बदलत्या ऋतूचा परिणाम आपल्या फॅशनवरही (fashion) दिसून येतो. उन्हाळ्यात अनेकदा उन्हामुळे आणि घामामुळे (sweating) लोक त्रस्त होतात. अशा परिस्थितीत लोक ताजंतवानं राहण्यासाठी टॅल्कम पावडरचा (talcum powder) वापर करतात. पण टॅल्कम पावडरचा जास्त वापर तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो हे तुम्हाला माहित आहे का ?
जर तुम्हीही उन्हाळ्यात नियमितपणे टॅल्कम पावडर वापरत असाल तर आधी त्याचे दुष्परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
त्वचा होऊ शकते कोरडी
उन्हाळ्यात आपल्याला खूपच घाम येतो आणि परिणामी आपली त्वचा तेलकट होते. मात्र तेलकट त्वचेपासून बचाव करण्यासाठी बरेच लोक विशेषतः महिला चेहऱ्यावर टॅल्कम पावडरचा वापर करतात. पण असे केल्याने तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. वास्तविक, चेहऱ्यावर पावडर लावल्याने तुमची त्वचा कोरडी होते, त्यामुळे कोरडेपणाची समस्या वाढू लागते. इतकेच नाही तर पुष्कळ वेळा पावडरमुळे पुरळ उठण्याची समस्याही सुरू होते. त्यामुळे चेहऱ्यावर टॅल्कम पावडर न लावणे कधीही चांगले ठरते.
स्किन इन्फेक्शनचा असतो धोका
उन्हाळ्यात आपल्या हातापायांना विशेषत: काखेत खूप घाम येऊन दुर्गंध येऊ लागतो. तो दूर करण्यासाठी बरेच लोक टॅल्कम पावडरचा वापर करतात. अशा परिस्थितीत त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता खूप वाढते. खरं तर, उन्हाळ्याच्या मोसमात लोक सहसा ते अंडरआर्म्सस, पोट किंवा कंबर येथे पावडर लावतात. पण त्यामुळे स्किन इन्फेक्शनची शक्यता अनेक पटींनी वाढते. खरंतर, टॅल्कम पावडरमध्ये स्टार्च असते, ज्याच्या वापराने घाम सुकतो, परंतु त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो.
त्वचेची छिद्र होऊ शकतात बंद
जर तुम्ही उन्हाळ्यात टॅल्कम पावडर वापरत असाल तर ते तुमच्या त्वचेचे छिद्र बंद करू शकते. खरंतर, पावडर अतिशय बारीक कणांची असते, ज्याचा वापर केल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात. इतकंच नाही तर पावडर उन्हाळ्यात घामाचे बाष्पीभवन होऊ देत नाही, ज्यामुळे पुरळ उठण्याची शक्यता वाढते.
श्वसनासंदर्भात समस्या उद्भवण्याची शक्यता
जर तुम्ही उन्हाळ्यात टॅल्कम पावडर वापरत असाल तर तुम्हाला श्वसनाचा त्रास होऊ शकतो. वास्तविक, त्याचे लहान कण हवेतून आपल्या वायुमार्गात प्रवेश करतात, ज्यामुळे त्याचे कण शरीरात पोहोचतात. अशा परिस्थितीत, यामुळे, तुम्हाला अस्वस्थता, श्वास घेण्यात समस्या आणि खोकला इ. याशिवाय, कधीकधी यामुळे, फुफ्फुसांमध्ये तीव्र जळजळ होणे, असा त्रास देखील उद्भवू शकतो.