या तीन कारणामुळे महिलांना होतोय किडनीच्या आजाराचा त्रास, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..

| Updated on: Jun 27, 2023 | 5:23 PM

महिलांमध्ये किडनी स्टोन आणि इन्फेक्शनची समस्या जास्त दिसून येते. मात्र याशिवायही आणखी काही आजारही आहेत जे महिलांमध्ये दिसून येतात. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

या तीन कारणामुळे महिलांना होतोय किडनीच्या आजाराचा त्रास, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
Image Credit source: freepik
Follow us on

Kidney Diseases : काही काळापूर्वी किडनी (kidney) संबंधित आजार हे मनुष्याला 60 व्या वर्षांनंतर होत असतं. पण आता काळ बदलला, लोकांची लाईफस्टाइल, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, अनियमित वेळा यामुळे सगळंच बदललं आहे. आजकाल वयाच्या तिशीतही किडनीचे आजार (kidney diseases) होताना दिसतात. बरेच लोक हे किडनी स्टोन किंवा इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल होताना दिसतात.

खरंतर किडनीचे आजार हे स्त्री व पुरूष दोघांमध्येही वाढताना दिसतात, पण महिलांमध्ये किडनी स्टोन आणि युरिन इन्फेक्शनची समस्या जास्त लपहायला मिळते. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे स्त्रिया या किडनी खराब होण्याच्या लक्षणांकडे नीट लक्ष देत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत हा त्रास वाढू लागतो. कोणत्या कारणांमुळे महिलांना मूत्रपिंडाचा आजार होतो ? हे जाणून घेणेही महत्वाचे ठरते.

हार्मोन्समध्ये गडबड

हार्मोनल विकार किंवा हार्मोनल समस्यांमुळे स्त्रियांमध्ये PCOS आणि PCOD सारख्या समस्या उद्भवतात. तसेच PCOS मुळे काही वेळा किडनीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे क्रोनिक किडनी डिसीज होऊ शकतो. त्यामुळे पीसीओएस आणि पीसीओडीसारख्या आजारांकडे लक्ष देणे आणि त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

मानसिक ताण

आजकाल महिलांमध्ये मानसिक ताणही खूप वाढताना दिसत आहे. या मानसिक ताणाचा आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम होत असतो. मात्र यामुळे किडनीशी संबंधित आजार होण्याचाही धोका उद्भवतो. त्यामुळे हे आजार व त्यापासून होणारा धोका टाळायचा असेल तर मानसिक ताण घेणे टाळले पाहिजे. जर मानसिक आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवत असतील तर मनोविकार तज्ज्ञांची भेट घेऊन सल्ला घ्यावा. त्यानुसार योग्य उपचार व औषधे घेऊन ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

गरोदरपणा

गरोदर असताना काही महिलांना युरिन इन्फेक्शन होते. मात्र त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्याचे किडनीच्या आजारातही रुपांतर होऊ शकते. हे टाळण्यासाठी गरोदरपणात युरिन इन्फेक्शनच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. लघवीला त्रास होत असेल किंवा लघवीचा रंग बदलत असेल तर त्वरित तुमच्या डॉक्टरांना भेटून त्यावर योग्य वेळीच उपचार करावेत. अन्यथा भविष्यात बराच त्रास सहन करावा लागू शकतो.

या गोष्टींकडेही द्या लक्ष

– योग्य खाणेपिणे

– दिवसभरात कमीत कमी ७ – ८ ग्लास पाणी प्यावे.

– गरोदर महिलांनी रुटीन चेक अप नियमितपणे करावेच

– शरीरात प्रोटीनची मात्रा वाढू देऊ नये.