नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : आपल्या शरीराची (body) रचना अतिशय कठीण आणि गुंतागुंतीची असते. शरीरातील कोणत्याही अवयवाला त्रास झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर आणि आरोग्यावर होतो. शरीराचे कार्य नीट चालावे आणि एनर्जी रहावी यासाठी स्नायूंमध्ये रक्ताभिसरण (blood circulation) सुरळीतपणे सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. जर रक्ताभिसरण प्रभावित झाले तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. रक्तप्रवाह नीट झाला नाही तर शरीराच्या बाहेरील अवयवांसह हृदयाशी (related to heart) संबंधित समस्यांचाही धोका वाढू शकतो.
बदललेली आणि बिघडलेली लाइफस्टाइल तसेच खराब खाणंपिण यामुळे रक्ताभिसणारवर विपरीत परिणाम होऊ शकतो. शरीरातील रक्ताभिसरणात अडथळे निर्माण झाले तर बधीर होणे, सूज येणे अशी लक्षणे बाहेरून दिसून येतात. तसेच या त्रासामुळे रक्तदाब, वजन वाढणे, मधुमेह यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. म्हणूनच आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसेच वेळीच डॉक्टरांनाही दाखवून घ्यावे. अशा परिस्थितीत कोणते पदार्थ फायदेशीर ठरू शकतात, ते जाणून घेऊया.
टोमॅटो
अन्नाची चव वाढवणाऱ्या टोमॅटोमध्ये लायकोपीन असते, जे हृदयासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच त्यातील व्हिटॅमिनमुळे रक्ताभिसरणही सुधारते.
ड्राय फ्रुटस
रोजच्या आहारात बदाम आणि अक्रोडसारख्या ड्राय फ्रुट्सचा समावेश करावा. त्यामध्ये असलेले ऑक्सीडेटिव्ह आपला स्ट्रेस कमी करतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यासही मदत करतात. तसेच त्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
या भाज्या खाव्यात
खराब रक्ताभिसरणाच्या त्रासापासून वाचण्यासाठी आहारात बीट आणि लसूण याव्यतिरिक्त हिरव्या पालेभाज्याही प्रमाणात खाव्यात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ
संत्र, मोसंब यांसारखी आंबट फळे आहारात समाविष्ट करा. व्हिटॅमिन सी युक्त फळं खाणं फायदेशीर असतं.
या गोष्टींची घ्या काळजी
रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी चांगली जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आहारामध्ये बदल करावा, तसेच योगासने आणि व्यायाम करणे आवश्यक आहे., ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)