जकार्ता : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांचे वजन (weight) सरासरीपेक्षा जास्त असते. काही वर्षांपूर्वी तुम्ही सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा फोटो पाहिला असेल, ज्यामध्ये एका लहान मुलाचे वजन खूप जास्त होते. त्या मुलाचे नाव आर्य परमाना आहे, जो जगातील सर्वात जाड मुलगा म्हणून प्रसिद्ध होता. पण आता आर्य पूर्णपणे बदलला आहे, कारण त्याने अथक मेहनत करून त्याचे 114 किलो (114 kg weight loss) वजन कमी केले आहे.
वजन कमी करण्यापूर्वी वयाच्या 10 व्या वर्षी आर्यचे वजन सुमारे 200 किलो झाले होते. वजन कमी करण्यासाठी त्याला इंडोनेशियाच्या प्रसिद्ध आणि व्यावसायिक बॉडीबिल्डरने मदत केली. आर्यचे वजन नेमके कसे कमी झाले? याबद्दल जाणून घ्या.
या कारणांमुळे वाढले आर्यचे वजन
इंडोनेशियात राहणाऱ्या आर्यला व्हिडीओ गेम्स खेळायला खूप आवडायचे. तो दिवसभर प्रोसेस्ड फूड, झटपट नूडल्ससारखे जंक फूड, तळलेले चिकन आणि कोल्ड्रिंक्स यांसारखे खाद्यापदार्थ सेवन करत होता. म्हणजेच एवढ्या लहान वयातही तो सुमारे 7000 कॅलरीज वापरत होता, जे त्याच्या शरीराच्या आवश्यकतेपेक्षा सहा ते सात पट जास्त होते. मात्र यामुळे त्याचे वजन भरमसाठी वाढले, ते इतके की आर्यला न चालता येत होते ना बसता. घरात अंघोळही करता येत नसे, म्हणून ते घराबाहेर मोठ्या हौदात स्नान करत असे. त्याच्या मापाचे धड कपडेही मिळत नव्हते.
वेट ट्रेनिंग घेऊन केले वजन कमी
एप्रिल 2017 मध्ये आर्यवर बॅरिॲट्रिक सर्जरी झाली, ज्यानंतर तो बॅरिॲट्रिक सर्जरी झालेला सर्वात लहान मुलगा ठरला. जकार्ता येथील ओम्नी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतर, त्याने बॉडीबिल्डिंग चॅम्पियन अडे राय यांची भेट घेतली, ज्यांच्याकडे एका जिमचे मालक आहेत.
आदे यांना जेव्हा आर्यबद्दल कळले तेव्हा त्यांनी आर्यसाठी मदतीचा हात पुढे केला आणि मग ते आर्यच्या घरच्यांशीही बोलले. आदे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आर्यने त्याच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आणि भाज्या, संपूर्ण धान्य यांसारख्या कमी कार्ब पदार्थ खाण्यास सुरुवात केली. यासोबतच त्याने आदेसोबत दररोज वेट ट्रेनिंगही सुरू केले, ज्यामुळे कॅलरी बर्न आणि स्नायू टोन होण्यास मदत झाली.
व्यायाम करण्यात आली मजा
आर्यला जिममध्ये व्यायाम करायला मजा येऊ लागली. आर्य खूप चालत असे, ज्यामुळे त्याला अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. आर्यने तीन वर्षांत अर्ध्याहून अधिक वजन कमी केले आहे आणि आता तो 13-14 वर्षांचा झाला आहे. आदे आणि आर्यचे नाते खूप घट्ट झाले आहे आणि दोघेही काका-पुतण्यासारखे राहतात. आर्य आता शाळेत जाऊ लागला आहे. तो स्वतःची कामे आता स्वत:च करू शकतो. तसेच इतर मुलांप्रमाणे फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळू शकतो .