झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची तुम्हालाही आहे का सवय ? होऊ शकतो हा आजार, लक्षणे जाणून घ्या

| Updated on: Aug 18, 2023 | 3:38 PM

Nocturia Disease : काही लोकांना रात्री जास्त पाणी पिण्याची सवय असते, पण असं करणं थांबवलं पाहिजे. जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला एक धोकादायक आजार होऊ शकतो.

झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची तुम्हालाही आहे का सवय ? होऊ शकतो हा आजार, लक्षणे जाणून घ्या
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली | 18ऑगस्ट 2023 : तुम्हालाही रात्री झोपण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याची सवय आहे का ? त्याचं उत्तर हो असं असेल तर ही सवय आजच बंद करा. कारण रात्री जास्त पाणी प्यायल्याने नॉक्टुरिया (Nocturia) आजार होऊ शकतो. या आजारात रात्री बऱ्याच वेळेस लघवी लागते. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि शरीरात अनेक आजार सुरू होऊ शकतात. काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची(drinking much water at night) सवय असते. काही लोकांच्या ब्लॅडरमध्ये जास्त पाणी जमा होते आणि ते हळूहळू बाहेर येते. यामुळे रात्री अनेकवेळा उठून लघवी करावी लागते.

तर काही वेळेस रात्री जास्त पाणी न पिताही अनेक वेळा लघवी लागू शकते. हे मधुमेहामुळे होऊ शकते. परंतु ज्या लोकांना मधुमेह किंवा इतर कोणताही त्रास नाही, तरीही जर त्यांना रात्रीच्या वेळेस अनेक वेळा लघवी लागत असेल तर ते नॉक्टुरिया रोगाचे लक्षण आहे.

नॉक्टुरिया म्हणजे काय ?

ज्येष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण, मद्याचे अधिक सेवन किंवा प्रोटेस्ट वाढल्याने नॉक्टुरिया होऊ शकतो. या आजारात त्या व्यक्तीला रात्रीच्या वेळेस दोनपेक्षा अधिक वेळेस लघवी लागते. जर कोणालाही हा त्रास जाणवत असेल तर त्यांनी त्वरित डॉक्टरांना दाखवले पाहिजे. नॉक्टुरिया हा काही फारसा धोकादायक आजार नाही, पण तरीही डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. अशावेळी डॉक्टर तुम्हाला लाइफस्टाइल सुधारण्याचा सल्ला देतील. तसेच रात्री झोपण्याच्या दोन तास आधी कोणतेही द्रव पदार्थ अधिक प्रमाणात न पिण्याचाही सल्ला देतील.

या लोकांना असतो अधिक धोका

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, 50 वर्षांच्या वरच्या लोकांना याचा धोका अधिक असतो. ही समस्या या वयोगटातील प्रत्येक 3 पैकी एक पुरुष आणि प्रत्येक 3 पैकी एक स्त्रीमध्ये दिसून येते. यापैकी काही लोकांना रात्री जास्त पाणी पिण्याची सवय असते. तर इतरांना मधुमेह किंवा इतर कोणताही किडनीचा आजार असू शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

– रात्री पाणी किंवा मद्य यांचे अधिक सेवन करू नका,

– रात्री उशीरा झोपण्याची सवय सोडा.

– एका आठवड्यापेक्षा अधिक काळ हा त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)