Cardiac arrest : जबतक हैं जां, जानेजहाँ… मै नाचूंगी ! पण इथे तर नाचतानाच होतोय लोकांचा मृत्यू ! कमी वयातच लोकांना का येतोय कार्डिॲक अरेस्ट ?

| Updated on: Mar 11, 2023 | 12:26 PM

कमी वयातच कार्डिॲक अरेस्टचा धोका फार वाढला आहे. कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती, कोणत्या लोकांना त्याचा अधिक धोका असतो, कार्डिॲक अरेस्टची जोखीम कमी कशी करता येईल, हे सर्व सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Cardiac arrest : जबतक हैं जां, जानेजहाँ... मै नाचूंगी ! पण इथे तर नाचतानाच होतोय लोकांचा मृत्यू ! कमी वयातच लोकांना का येतोय कार्डिॲक अरेस्ट  ?
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते व दिग्दर्श सतीश कौशिक (satish kaushik) यांचा मृत्यू कार्डिॲक अरेस्टमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. कॉमेडिअन राजू श्रीवास्तव, संगीतकार आणि गायक केके, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, भाभी जी घर पर है फेम मलखान उर्फ ​​दीपेश भान इत्यादी सेलिब्रिटींनाही कार्डिॲक अरेस्टने (cardiac arrest) प्राण गमवावे लागले. काही काळापासून अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत ज्यात रस्त्यावर फिरताना, जिममध्ये वर्कआऊट करताना किंवा लग्नात डान्स (dancing) करतानाही कार्डिॲक अरेस्टमुळे तरुणांचा मृत्यू होत आहे. आणि हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात घडत आहे.

यापूर्वी कार्डिॲक अरेस्टची प्रकरणं अधिक वयाच्या लोकांमध्ये दिसून येत होती. पण आजची परिस्थिती बदलली आहे. आज तरुण व्यक्तीही यातून सुटू शकत नाहीत. कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती, कोणत्या लोकांना त्याचा अधिक धोका असतो, कार्डिॲक अरेस्टची जोखीम कमी कशी करता येईल, हे सर्व तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

कार्डिॲक अरेस्ट मुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यांचं वास्तव भयानक आहे

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट्सच्या सांगण्यानुसार, भारतात कार्डिॲक अरेस्टने ग्रस्त असलेल्या 30 टक्के लोकांचे वय 45 वर्षांपेक्षा कमी आहे. हृदयविकारामुळे भारतात दरवर्षी सुमारे 12 लाख तरुणांचा मृत्यू होतो आणि हा आकडा वाढतच चालला आहे, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. भारतातील सुमारे 10 टक्के मृत्यू हे अचानक आलेल्या कार्डिॲक अरेस्टमुळे होतात, हे जगातील मृत्यूचे सर्वात सामान्य कारण आहे. कार्डिॲक अरेस्ट हा हृदयाशी संबंधित आहे..अत्यंत धोकादायक स्थिती. या स्थितीत हृदयाचे कार्य अचानक थांबते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

कार्डिॲक अरेस्ट बद्दल समजून घ्या माहिती

कार्डिॲक अरेस्ट आल्यास हृदय काम करणे थांबवते. जर हृदयाचे कार्य थांबले तर ते रक्त पंप करू शकत नाही आणि काही वेळातच त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. कार्डिॲक अरेस्ट बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हृदय अचानक थांबत नाही. पहिले ते 3-5 मिनिटांच्या कालावधीसाठी सामान्यतः 350-400 BPM (प्रति मिनिट बीट्स) च्या वेगाने धडधडते आणि नंतर थांबते. या काळात तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा वाचवण्यासाठी 3-5 मिनिटे मिळतात. यावेळी जर एखाद्याला सीपीआर किंवा इलेक्ट्रिक शॉक (डिफिब्रिलेशन) ही उपचार पद्धती मिळाली तर त्याचा जीव वाचू शकतो.

आपत्कालीन परिस्थितीत, कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) आणि इलेक्ट्रिक शॉक (डिफिब्रिलेशन) यांच्या मदतीने कार्डिॲक अरेस्टच्या परिस्थितीत काही मदत मिळू शकते. अशा प्रकारे, फुफ्फुसांमध्ये पुरेसा ऑक्सिजन राहतो. सीपीआर आणि इलेक्ट्रिक शॉक वेळेवर मिळाल्यास कार्डिॲक अरेस्टपासून जीव वाचू शकतो.

काय आहेत कार्डिॲक अरेस्टची लक्षणे ?

तसं पहायला गेलं तर कार्डिॲक अरेस्टची लक्षणे समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार योग्य उपचार करण्यास व्यक्तीला पुरेसा वेळ मिळत नाही. पण तज्ज्ञांच्या मते, कार्डिॲक अरेस्टमुळे शरीरात काही फरक दिसू लागतात. त्यांच्याकडे लक्ष दिल्यास कार्डिॲक अरेस्टचा सामना केला जाऊ शकतो.

– बेशुद्ध होणे

– हृदयाची गती वाढणे

– छातीत वेदना होणे

– चक्कर येणे

– श्वास घेण्यास त्रास होणे

– उलटी होणे

– पोटात व छातीत एकत्र वेदना होणे

कार्डिॲक अरेस्टचा धोका कोणाला जास्त ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार 35-40 वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक आहे. खाली 9 प्रमुख घटक आहेत जे 90 टक्के कार्डिॲक अरेस्ट किंवा हृदयाशी संबंधित आजारांसाठी जबाबदार आहेत. यापैकी दोन किंवा अधिक जोखीम घटकांमुळे कार्डिॲक अरेस्टआणि हृदयविकाराचा धोका वाढतो. हे घटक आहेत…

– धूम्रपान करणे

– खराब कोलेस्ट्रॉल

– हाय ब्लड प्रेशर

– मधुमेह

– मानसिक व सामाजिक तणाव

– व्यायाम अथवा वर्कआऊट न करणे

– लठ्ठपणा

– भाज्या व फळांचे सेवन कमी करणे

– मद्यपान करणे

तरूण कसा कमी करू शकतात कार्डिॲक अरेस्टचा धोका ?

जास्त वजन, ब्लड शुगर, हाय ब्लड प्रेशर , कौटुंबिक इतिहास, कोविड रिकव्हरी इत्यादी बाबींमुळे कार्डिॲक अरेस्टचा मुख्य धोका असू शकतो. जर एखादी व्यक्ती निरोगी जीवनशैली जगत असेल, वजन नियंत्रणात ठेवत असेल, रक्तदाब नियंत्रित ठेवत असेल आणि कुटुंबातील एखाद्याचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू झाला असेल, वेळोवेळी डॉक्टरांना भेट दिली असेल, तर त्याला/तिला कार्डिॲक अरेस्टआणि हृदयविकाराचा धोका असतो.

तरुणांबद्दल सांगायचे झाले तर क्षमतेपेक्षा जास्त काम करणे, जिममध्ये जाऊन वजन उचलणे, तासनतास व्यायाम करणे, धूम्रपान, मद्यपान, खाण्याच्या चुकीच्या सवयी, पुरेशी झोप न घेणे आदींमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. शारीरिक हालचालींसाठी, दररोज 30-40 मिनिटे व्यायाम किंवा आठवड्यात 150-180 मिनिटे व्यायाम केल्याने निरोगी राहता येऊ शकते. व्यायामशाळेत जाणे आणि जड वजन उचलणे आवश्यक नाही.

तंदुरुस्त राहण्यासाठी बॉडी वेट एक्सरसाइज किंवा जॉगिंग, धावणे, सायकल चालवणे, श्वासोच्छवासाचे व्यायाम यांसारखे कार्डिओव्हॅस्क्युलर व्यायाम घरी किंवा पार्कमध्ये देखील केले जाऊ शकतात.

धूम्रपान-मद्यपानापासून दूर राहा आणि किमान 7-8 तास पूर्ण झोप घ्यावी. जर लवकर झोप येत नसेल, तर मोबाईलचा अतिवापर हेही त्याचे कारण असू शकते. ठराविक वेळेनंतर तुम्ही मोबाईल वापरणार नाही अशी ठरवल्यास तुम्ही लवकर झोपू शकता, ज्यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होईल.