नवी दिल्ली – डोकेदुखी ही एक अतिशय सामान्य समस्या आहे (headache) पण त्याचा त्रास खूप होतो. अनेक वेळेस इतकी तीव्र डोकेदुखी सुरू होते की डोकं हलवणंही कठीण होतं. डोकेदुखीचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने हायड्रेटेड (be hydrated) राहणं खूपच महत्वाचं आहे, कारण पाणी आपल्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. खरंतर डोकेदुखीचा त्रास कोणत्याही कारणांमुळे होऊ शकतं, त्यापैकीच एक कारण म्हणजे पोटात होणारा गॅस… वाचून आश्चर्य वाटलं असेल ना ? पण हे खरं आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, गॅसेसमुळे होणारी डोकेदुखी (gastric headache) अतिशय वेदनादायक असते. गॅसेस आणि डोकेदुखी यात काय संबंध आहे ते जाणून घेऊया.
अखेर का होतो डोकेदुखीचा त्रास ?
ही डोकेदुखी खराब पचनामुळे होते. अन्न नीट पचले नाही तर पोटात गॅस तयार होतो – त्यामुळे डोक्याच्या एका बाजूला वेदना सुरू होतात. शरीरात कार्बन डायऑक्साइड वायू वाढल्याने ही डोकेदुखी सुरू होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपले शरीर कार्बोहायड्रेट्स आणि साखर योग्य प्रकारे पचवू शकत नाही, तेव्हा पोटात गॅस तयार होऊ लागतो. त्यामुळे गॅस्ट्रिक होऊ लागते. एका संशोधनात अशीही माहिती समोर आली आहे की, ज्या लोकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो त्यांना पचनाशी निगडीत समस्या असण्याचा धोका असतो.
गॅस्ट्रिक डोकेदुखीची लक्षणे कोणती ?
– झोपेची कमतरता
– उदास वाटणए
– चिडचिड होणे
– पोटात दुखणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणे
– मळमळ आणि उलटीचा त्रास होतो
– थकवा येणे
डोकेदुखीपासून कशी होईल मुक्तता ?
– या डोकेदुखीपासून मुक्त होण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे लिंबू पाणी पिणे. त्यामध्ये दाहक-विरोधी म्हणजेच अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून ते नीट मिक्स करून प्यावे. हे पाणी प्यायल्याने गॅसमुळे होणारी डोकेदुखी थांबण्यास मदत होते.
– जर गॅस किंवा ॲसिड रिफ्लेक्सची समस्या असेल तर तुम्ही आल्याचे पाणी, सेलेरीचे पाणी किंवा बडीशेपचे पाणी पिऊ शकता. यामुळे गॅसेस आणइ पर्यायाने त्यामुळे होणाऱ्या डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
– योगासनांच्या सहाय्याने तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच गॅस्ट्रिक डोकेदुखीही कमी होते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)