डिलीव्हरीनंतर अनेक महिलांना लघवी रोखता येत नाही; असे का होते ?

| Updated on: Apr 14, 2023 | 4:24 PM

युरिनरी इनकॉंटिनन्स ही प्रसूतीनंतरची अशी स्थिती आहे, जी काही आठवड्यांनंतर बरी होते. पण, काही स्त्रियांना त्याचा बराच काळ त्रास होतो.

डिलीव्हरीनंतर अनेक महिलांना लघवी रोखता येत नाही; असे का होते ?
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : प्रसूतीनंतर बहुतांश महिलांना लघवी रोखता न येण्याची समस्या सतावते, हे तुम्हाला माहित आहे का ? याला युरिनरी इनकॉंटिनन्स (Urinary incontinence) असेही म्हणतात. बाळाच्या जन्मानंतर (after delivery of baby) काही आठवड्यांत ही समस्या सुरू होते. सोप्या शब्दांत सांगायचे झाले युरिनरी इनकॉंटिनेंसही प्रसूतीनंतर उद्भवणारी अशी एक स्थिती आहे, ज्यामध्ये प्रसूतीनंतर स्त्रियांचे मूत्राशयावर (less control on bladder) फारच कमी नियंत्रण असते. त्यामुळे दिवसातून अनेक वेळा लघवी गळतीची समस्या निर्माण होते.

या संदर्भात तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.

युरिनरी इनकॉंटिनन्स म्हणजे नक्की काय ?

ही समस्या सहन कराव्या लागणाऱ्यांचे लघवीवर नियंत्रण राहत नाही आणि लघवीचे काही थेंब अचानक बाहेर पडतात. युरिनरी इनकॉंटिनन्सचे दोन प्रकार आहेत. प्रथम, जेव्हा एखादी व्यक्ती हसते, शिंकते, खोकते किंवा चालते, तेव्हा ओटीपोटाच्या भागावर दाब पडल्याने लघवी बाहेर पडते. याला स्ट्रेस इनकॉंटिनन्स म्हणतात.

तर दुसरा प्रकार म्हणजे अर्ज इनकॉंटिनन्स होय. म्हातारपणात मूत्राशय आणि किडनीचे स्नायू इतके कमकुवत होतात की ते लघवीचा दाब थोड्या काळासाठीही सहन करू शकत नाहीत आणि शौचास जाण्यापूर्वीच लघवी बाहेर येते. याला अर्ज असंयम म्हणतात. काही महिलांमध्ये स्ट्रेस इनकॉंटिनन्सचा त्रास असतो आणि आणि अर्ज इनकॉंटिनन्सची तीव्र लक्षणे जाणवतात. तर काही स्त्रियांमध्ये दोन्ही प्रकारची लक्षणे असतात.

युरिनरी इनकॉंटिनन्सचा त्रास का जाणवतो ?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, “गर्भधारणेदरम्यान प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन वाढतो. यामुळे गर्भाशय आणि मूत्राशय या दोन्हीच्या स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे आवश्यक स्नायू ताणले जातात. पण, सामान्य प्रसूतीदरम्यान, जेव्हा बाळ योनीमार्गातून जाते, बाहेर येते. तेव्हा गर्भाशयाचे, नंतर श्रोणिचे सर्व स्नायू ताणले जातात आणि नंतर योनीमार्ग देखील ताणला जातो. हार्मोन्स आणि स्ट्रेचिंग या दोन्हीच्या परिणामामुळे, युरिनरी इनकॉंटिनन्स असण्याची समस्या उद्भवते. ही समस्या प्रसूतीनंतर काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनंतर उद्भवते.

युरिनरी इनकॉंटिनन्सवर उपचार

ही समस्या टाळण्यासाठी प्रसूतीनंतर ताबडतोब स्त्रीने पेल्विक फ्लोअर किंवा कीगेल व्यायाम करावेत. प्रसूतीनंतर, महिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी फिजिओथेरपिस्टकडून या व्यायामांचे प्रशिक्षण दिले जाते. हे व्यायाम दररोज केले पाहिजेत. हे पेरिनियमच्या स्नायूंना बळकट करतात आणि कालांतराने युरिनरी इनकॉंटिनन्सच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात.

साध्या जीवनशैलीत बदल केल्यास, युरिनरी इनकॉंटिनन्सच्या उपचारात मदत करू शकतात. यामध्ये प्रसूतीनंतर वजन कमी करणे, जास्त फायबरयुक्त पदार्थ खाणे, जास्त पाणी पिणे आणि वजन उचलणे टाळणे यांचा समावेश होतो.

गर्भधारणेदरम्यान, बाळ वाढते आणि तुमच्या मूत्राशयावर दबाव पडतो, यामुळेच तुम्हाला वारंवार लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते. परंतु, बाळाच्या जन्मानंतर, तुम्ही मूत्राशयाला लघवी रोखण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे.

मात्र यापैकी कोणतेही उपचार नुकत्याच प्रसूती झालेल्या स्त्रीसाठी काम करत नसतील, अथवा फायदेशीर ठरत नसतील तर युरिनरी इनकॉंटिनन्स वर उपचार करण्यासाठी औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: स्ट्रेस इनकॉंटिनन्स साठी औषधे आवश्यक आहेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. )