नवी दिल्ली – आजकाल मायग्रेनचा (Migraine) आजार हा खूप सामान्य झाला आहे. यामध्ये पीडित व्यक्तीला तीव्र डोकेदुखीचा (headache) त्रास होतो. कधीकधी ही वेदना असह्य होते. त्याच वेळी, या परिस्थितीत उलट्या होणे आणि मळमळ अशी लक्षणेही जाणवू शकतात. मायग्रेनचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे आभासी तर दुसरा म्हणजे वास्तविक. मायग्रेन हा आजार मानसिक ताण-तणाव, नसा ताणणे, थकवा, बद्धकोष्ठता, अतिप्रमाणात मद्यपान करणे, रक्ताची कमतरता, सर्दी-खोकला (causes of migraine) इत्यादी कारणांमुळे होतो. सुरुवातीच्या टप्प्यावर त्यावर सहज उपचार करता येतात. मात्र निष्काळजीपणा केल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
मायग्रेनचा त्रास टाळायचा असेल तर त्यासाठी आहार आणि जीवनशैली सुधारली पाहिजे. आरोग्य तज्ज्ञही मायग्रेनच्या रुग्णांना अनेक गोष्टी न खाण्याचा सल्ला देतात. मायग्रेनमध्ये काय खावे आणि काय टाळावे हे जाणून घेऊया.
काय खाऊ नये ?
मद्यपान करू नये
दारू ही आरोग्यासाठी चांगली नसते. त्यात अल्कोहोल मुबलक प्रमाणात आढळते. त्याच्या सेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. विशेषतः मायग्रेनच्या रुग्णांनी दारू पिऊ नये. यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.
डार्क चॉकलेट खाऊ नका
डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याच्या सेवनाने विविध आजारांवर आराम मिळतो. मात्र, मायग्रेनच्या रुग्णांनी डार्क चॉकलेटचे सेवन करू नये. त्याच्या सेवनामुळे मायग्रेनचा धोका वाढू शकतो. एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की डार्क चॉकलेट खाल्ल्याने मायग्रेनचा धोका वाढतो.
चहा ठराविक प्रमाणात प्यावा
अनेकदा लोक असं म्हणतात की चहा-कॉफी प्यायल्याने तणाव कमी होतो. ते प्यायल्याने फ्रेश वाटते. मात्र, मायग्रेनच्या रुग्णांनी चहा किंवा कॉफी पिऊ नये. चहा आणि कॉफीमध्ये कॅफेन हे मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे मायग्रेनचा त्रास आणखी वाढते.
काय खावे ?
करा केळ्याचे सेवन
केळी ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ती खाल्याने शरीरात ऊर्जेचा संचार होतो. केळ्यांमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम आढळते. पोटॅशिअम युक्त अन्न खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्याचबरोबर मॅग्नेशिअम युक्त अन्न खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय मायग्रेनसाठीही मॅग्नेशिअम फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्ही रोज केळं खाऊ शकता.
सी-फूड
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सीफूडच्या सेवनाने मायग्रेनचा धोका कमी होतो. सीफूडमध्ये आढळणारे ओमेगा -3 फॅटी ॲसिड हे पोषक तत्वं मायग्रेनसाठी फायदेशीर ठरते. जर तुम्हाला मायग्रेनचे त्रास असेल तुम्ही आठवड्यातून दोनदा सी-फूडचे सेवन केले पाहिजे. याशिवाय हिरव्या भाज्या आणि व्हिटॅमिन-सी युक्त फळेही खाऊ शकतात.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)