नवी दिल्ली : उन्हाळा चांगलाच वाढू लागला आहे. या ऋतूमध्ये पारा झपाट्याने चढतो, त्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. वाढत्या तापमानाचा परिणाम किडनीवरही (Kidney) होतो. उष्णता आणि आर्द्रता आपल्या किडनीसाठी खूप हानिकारक आहे. उन्हाळ्याला अनेकदा किडनी स्टोन सीझन म्हटले जाते, कारण घाम येण्यामुळे आपल्या शरीरात लवकर निर्जलीकरण होते. आणि निर्जलीकरण हे किडनी स्टोनचे (Kidney stone) एक सामान्य कारण आहे.
किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपले रक्त शुद्ध करतो. किडनी शरीरातील विषारी घटक काढून टाकते. किडनी ही इलेक्ट्रोलाइट्सची पातळी electrolyte level) नियंत्रित करते. किडनीद्वारे शरीरात मीठ, पाणी आणि खनिजे यांचे संतुलन राखले जाते. किडनीमध्ये असलेले लाखो फिल्टर रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतात.
उन्हाळ्यात का वाढते किडनी स्टोनची समस्या ?
– उन्हाळ्यातील 80 टक्के किडनीच्या समस्या कॅल्शियममुळे होतात.
– लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.
– पाण्याच्या कमतरतेमुळे लघवी एका जागी जमा होऊन किडनीमध्ये स्टोनचे रूप धारण करते.
किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी आहारात करा हे बदल
– जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करा (Reduce The Level Of Salt In Diet) जास्त मीठ खाल्ल्याने लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण वाढते.
– उन्हाळ्यात चहा-कॉफीचे सेवन कमी करावे (Reduce Tea-Coffee Intake In Summer). कॅफिनचे जास्त सेवन केल्याने शरीरातील डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते.
– भरपूर पाणी प्यावे. तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता याची काळजी घ्या. जास्त पाणी पिणे हे किडनी डिटॉक्स करण्यासाठी प्रभावी आहे.
– आहारात द्रव पदार्थांचे अधिक सेवन करा. ताक, लस्सी, रस, लिंबूपाणी यांचे सेवन केल्याने किडनी निरोगी राहते.
– लघवी नियमित तपासा. तुम्ही किती वेळा लघवी करता याचा मागोवा घ्या.
– लघवीचा प्रवाह कसा आहे ते देखील तपासा.
– कधीही लघवी रोखून ठेवू नका. मूत्राशय नियमितपणे रिकामे करा. लघवी थांबवून ठेवल्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.
उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढते. उन्हाळ्यात आपण काय खातो हे देखील खूप महत्वाचे आहे. आंबट पदार्थांमुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते, या पदार्थांमध्ये मीठ, प्रोटीन आणि साखर जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. उन्हाळ्यात किडनी स्टोन टाळायचा असेल तर आहारात काही बदल करणे महत्वाचे ठरते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)