Curd Side Effects : पावसाळा (monsoon) हा सर्वांचा आवडता ऋतू आहे. गारवा घेऊन येणारा हा ऋतू त्याच्यासोबत अनेक आजारही घेऊन येत असतो. पावसाळ्यात अनेक आजार पसरण्याचा धोकाही असतो. म्हणूनच या काळात आरोग्याची, तसेच खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेणे गरजे असते. हेल्दी लाईफस्टाइल फॉलो केली पाहिजे. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये काही पदार्थ खाणे वर्ज्य असते. त्यामध्ये दह्याचा (Curd) देखील समावेश असतो.
आयुर्वेदानुसार पावसाळ्याच्या ऋतूमध्ये दही खाऊ नये. ते खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. पण या ऋतूत दही का खाऊ नये, हे तुम्हाला माहीत आहे का ? या ऋतूत दही खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होते ? याबाबत तज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.
वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्याच्या ऋतूमध्ये दही खाल्ल्याने त्वचेवर फोड येणे, पिंपल्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय त्वचेवर खाज येण्याची समस्याही सुरू होऊ शकते. म्हणूनच या ऋतूत दही खाणे टाळावे. तसेच पावसाळ्यात ऋतूत दही खाल्ल्याने फंगल इन्फेक्शनची समस्याही वाढते. त्यामुळे पावसाळ्यात दही खाणे टाळावे, असे तज्ज्ञ सांगतात.
पचनाशी संबंधित समस्या
पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया तशीही थोडी मंदावते. त्यातच या ऋतूत आपण दही खाल्ले तर मेटाबॉलिज्म बिघडू शकते. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यामुळे, पोटात संसर्ग होण्याचा धोकाही बराच वाढतो. म्हणूनच या ऋतूत दही खाणे टाळावे. दही खाल्ल्याने आपली पचनशक्ती कमजोर होते. तसेच पावसाळ्यात दही खाल्ल्याने खोकला आणि सर्दी होऊ शकते, क्वचित तापही येऊ शकतोय ज्या लोकांना फुफ्फुसाची समस्या किंवा त्रास आहे, दही खाल्ल्याने त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो. म्हणूनच पावसाळ्यात दही खाणे टाळावे.
हाडांशी संबंधित समस्या
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्यात दही खाल्ल्याने हाडांशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. तसेच दही खाल्ल्याने आर्थ्रायटिसचा त्राही होऊ शकतो. त्यामुळे दही न खाणे उत्तम ठरते
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)