नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : बहुतांश लोक दुपारच्या जेवणानंतर तास – दोन तास झोप (sleeping in afternoon) काढणे पसंत करत, विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी जास्त झोपतात. सकाळपासून दुपारपर्यंत घरातील वेगवेगळी कामे केल्यानंतर लोकांना थकवा जाणवू लागतो. त्यामुळेच अनेकदा दुपारच्या जेवणआनंतर थोडा वेळ आराम करण्यासाठी ते आडवे पडतात आणि झोप काढतात.
पण आयुर्वेदानुसार रात्र असो वा दुपार, जेवल्यानंतर कधीही लगेचच आडवं पडण्याची किंवा झोपण्याची चूक करू नये. कारण त्याचा आरोग्यावर आणि शरीरावर वाईट परिणाम होतो. जेवल्यानंतर तुम्हाला नेहमी झोप येत असेल आणि झोपल्याशिवाय तुम्ही राहू शकत नसाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या.
जेवल्यानंतर लगेच झोपू नये असे म्हणतात, कारण यामुळे शरीरातील चरबी आणि पाण्याचे घटक वाढू शकतात. तसेच आपली पचनसंस्था खराब होऊ शकते. मेटाबॉवलिज्म किंवा चयापचयही कमकुवत होऊ शकते. जेवल्यावर लगेच झोपल्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, वजन वाढणे आणि कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते. कते. आयुर्वेदानुसार, जे लोक जास्त शारीरिक श्रम करतात, उदा – वृद्ध आणि लहान मुलं, ते ४०-५० मिनिटे झोपू शकतात. तसेच जे लोक दुपारी जेवत नाहीत, तेही थोडा वेळ झोपू शकतात.
वज्रानसनात बसा
जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी १५-२० वज्रासनात मिनिटे बसावे, असे आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. वज्रासनात बसल्यामुळे अन्न लवकर पचतं, चयापचय क्रिया निरोगी राहते आणि ॲसिडीटी, अपचन, बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याचा त्रास होत नाही. तसेच जेवल्यानंतर काही वेळ शतपवाली केल्यानेही अन्न पचण्यास मदत होते. फक्त जेवल्यावर कोणताही जड व्यायाम करू नये. थोडा वेळ चालल्यानेही फायदा होतो. तसेच जेवल्यानंतर नेहमी डाव्या कुशीवर झोपावे.
होऊ शकतात अनेक आजार
दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे, त्यानंतर लगेच झोपण्याची चूक करू नका. ही चूक तुम्ही वारंवार करत असाल तर तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांचा आणि गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)