नवी दिल्ली : सांधेदुखी (Joint Pain) ही खूपच त्रासदायक असू शकते. स्त्रियांमध्ये सांधेदुखीची विशेषत: गुडघेदुखीची समस्या अनेकदा दिसून येते. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा अभाव, व्यायामाचा अभाव (no exercise) यामुळे सांध्यांचा त्रास वाढतो. खरंतर गुडघ्याचा त्रास कोणालाही होऊ शकतो. पण ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसून येते. जास्त वजन (weight gain), व्यायाम न करणे आणि इतर कारणांमुळे महिलांमध्ये गुडघेदुखी सुरू होते.ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. ज्या महिलांमध्ये लठ्ठपणा जास्त असतो, त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक गंभीर बनते. त्या स्त्रिया वेदनांकडे दुर्लक्ष करतात आणि नियमित जीवन जगत राहतात, पण हा त्रास अधिक वाढतो.
या कारणांमुळे होतो गुडघेदुखीचा त्रास
1) पुरुषांपेक्षा स्त्रियांना गुडघेदुखी जास्त असते. स्त्रियांमध्ये हा त्रास सामान्यतः त्यांच्या शारीरिक रचनेमुळे होतो. महिलांच्या सांध्याची हालचाल अधिक असल्याने त्यांचे अस्थिबंधन अधिक लवचिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महिलांनी गुडघ्याची जास्त हालचाल केल्यास वेदना वाढतात.
2) स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान आणि मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीनंतर, शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी कमी होते. इस्ट्रोजेन हार्मोन हे गुडघे निरोगी ठेवण्याचे काम करतो. पीरियड्समध्ये इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाली की त्याचा परिणाम गुडघ्यांवरही दिसून येतो.
3) अनेक वेळा महिलांच्या गुडघ्याला दुखापत होते. त्या त्यावर वेळीच उपचार करत नाहीत आणि दुखणे वाढते. यामुळे भविष्यात गुडघ्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
4) लठ्ठपणा हे महिलांच्या गुडघेदुखीच्या समस्येचे प्रमुख कारण आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना सामान्यतः लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. जास्त वजनामुळे गुडघ्यांवर दबाव येतो. डॉक्टर म्हणतात की गुडघा त्याच्या वजनाच्या 5 पट दाब सहन करतो. महिला लठ्ठ झाल्या तर त्यांना गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.
असा करावा बचाव
1) गुडघे निरोगी ठेवायचे असतील तर गुडघ्यांवर जास्त दबाव येईल असा व्यायाम करणे टाळावे. गुडघ्यांमधील कार्टिलेजचे नुकसान होता कामा नये, अन्यथा त्रास वाढू शकतो.
2) वजनाची विशेष काळजी घेतली पाहिजे. जास्त वजन असेल तर गुडघ्यांवर खूप दबाव येतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
3) बरेच लोक पटकन उठून बसतात. धावपळ करतात, व्यस्त करतात. चुकीची योगासने करतात. त्यामुळे ताण येऊन गुडघे दुखू शकतात. वेदना वाढू शकतात.
4) गुडघ्यांना सूज आली, किंवा वेदना अथवा इतर समस्या जाणवल्या तर महिलांनी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. यामुळे समस्या अधिक गंभीर होऊ शकते.