Raw Mango : उन्हाळ्यात का करावे कैरीचे सेवन ? जाणून घ्या कारण आणि फायदेही

| Updated on: Apr 22, 2023 | 4:16 PM

Raw Mango : कैरीचे लोणचं किंवा पन्हं या स्वरूपातही तुम्ही कैरीचे सेवन करू शकता. उन्हाळ्यात कैरी खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात.

Raw Mango : उन्हाळ्यात का करावे कैरीचे सेवन ? जाणून घ्या कारण आणि फायदेही
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : उन्हाळ्यात आंबा (mangoes in summer) मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. या हंगामात आंब्याचे विविध प्रकार येतात. यामध्ये अल्फान्सो आणि आम्रपाली यांसारख्या अनेक प्रकारच्या आंब्यांचा समावेश आहे. याशिवाय कच्च्या आंब्याचाही त्यात समावेश आहे. कच्च्या आंब्याला कैरी (raw mango) असेही म्हणतात. ते आंब्यापेक्षा किंचित लहान असतात. त्याची चव खूप आंबट (sour)असते. कैरीचा थंड प्रभाव असतो. उन्हाळ्यात तुम्ही ती अनेक प्रकारे खाऊ शकता.

आमटी बनवण्यासाठी तुम्ही कैरीचा वापर करू शकता. याशिवाय त्यापासून चविष्ट असे पन्हेही तयार होते. ते चव आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. उन्हाळ्यात कैरी खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात कैरी का खावी ?

साखर कमी असते

इतर ताज्या फळांच्या तुलनेत कैरीमध्ये नैसर्गिक साखर कमी असते. एवढेच नाही तर कैरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे कैरी खाणे फायदेशीर ठरू शकते.

हृदयासाठी चांगली

कैरीमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही रक्त प्रवाह सुधारतात. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे पोषक तत्व रक्तदाब पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. त्यात असलेले मॅंगिफेरिन एक उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट आहे. कैरी हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते.

पाचन तंत्र

कैरीमध्ये अमायलेज असते. हे पाचक एंझाइम आहे. कैरी खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे माल्टोज आणि ग्लुकोज सारख्या शर्करामध्ये रूपांतरित करण्याचे काम करते.

कोलेस्ट्रॉल

निरोगी शरीरासाठी डिटॉक्सिफिकेशन खूप महत्वाचे आहे. कैरीमध्ये पोषक तत्व असतात जे शरीराला डिटॉक्स प्रक्रियेत मदत करतात. हे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे यकृताचे कार्य सुधारते.

वजन कमी करण्यास फायदेशीर

कैरीमध्ये कॅलरीज कमी असतात. उन्हाळ्यात स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. हे खाल्ल्याने निरोगी वजन राखण्यास मदत होते. कैरीमध्ये व्हिटॅमिन सी, के, ए, बी6 आणि फोलेटसारखे अनेक पोषक घटक असतात. ते पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करतात.