वाटते अंधाराची भीती ? तुम्हीसुद्धा रात्री दिवा लावून झोपता का ? या गंभीर आजाराचा असू शकतो धोका

| Updated on: Mar 29, 2023 | 8:26 AM

Sleeping While Light On : तुम्ही सुद्धा लाईट लावून झोपत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, वेळीच काळजी घ्या, अन्यथा तुम्ही गंभीर आजारी पडू शकता.

वाटते अंधाराची भीती ? तुम्हीसुद्धा रात्री दिवा लावून झोपता का ? या गंभीर आजाराचा असू शकतो धोका
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : झोप (sleep) ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. शांत झोपेचा आरोग्यावर (effect on health) सकारात्मक परिणाम होतो. नीट झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी चिडचिड होणे, सुस्ती वाटणे असे अनेक त्रास होऊ शकतात. काही लोकांना रात्री झोपताना पूर्ण अंधार (darkness) हवा असतो, मात्र काही थोड्या उजेडातच झोपायची सवय असते. जर तुम्हीही रात्री दिवे लावून झोपत (lights on) असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे मत आरोग्य तज्ञांनी व्यक्त केले आहे. तरुण-तरुणींनी चांगल्या आरोग्यासाठी 8 तासांची झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रत्येक व्यक्तीसाठी, चांगली झोप ही थेरपीसारखी असते जी तुम्हाला शरीराच्या संपूर्ण थकव्यापासून आराम देते. शांत झोपेने तुमचा मेंदू व्यवस्थित काम करतो. तसेच स्नायूंचीही रिकव्हरीही होते. मूड चांगला राहतो तसेच अनेक आजारांचा धोकाही रहात नाही. पण झोपताना आपण काही खबरदारी पाळली पाहिजे, अन्यथा यामुळे शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

झोपताना तुम्हीही या चुका करता का ?

हे सुद्धा वाचा

साधारणपणे अनेक लोकांना झोपताना खोलीचे सर्व दिवे बंद करण्याची सवय असते जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. पण काही लोक असं अजिबात करत नाहीत. काही लोकांना दिवे लावून, थोडा उजेड ठेवून झोपायला आवडते किंवा काही लोक आळशीपणामुळे दिवे बंद करत नाहीत. पण तुदिवे लावून झोपणं हे आरोग्यासाठी फायदेशीर नाही, हे समजून घेणे महत्वाचे ठरते.

दिवे लावून झोपल्याने हे नुकसान होते

डिप्रेशन

निरोगी जीवनशैलीसाठी जसा प्रकाश आवश्यक आहे, तेवढाच अंधारही महत्वाचा ठरतो. स्वीडन आणि नॉर्वे सारख्या देशांमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात सुमारे 6 महिने सूर्य मावळत नाही हे तुम्ही अनेकदा वाचले असेल. त्यामुळे अनेक लोक डिप्रेशनचे बळी ठरतात. तर भारतात जर त्यांना प्रकाशात झोपायचे असेल तर ते यासाठी इलेक्ट्रॉनिक दिवे वापरतात. जिथे निळ्या प्रकाशामुळे तुमची चिडचिड होऊ शकते.

अनेक आजारांचा असतो धोका

जर तुम्ही लाईट लावून झोपलात तर तुम्हाला शांत झोप येत नाही. झोप नीट पूर्ण झाली नाही तर त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाची समस्या, अशा अनेक आजारांचा धोका असतो. म्हणूनच चुकूनही दिवे लावून झोपू नये. शक्यतो अंधार करून शांत वातावरणात झोपावे.

थकवा

असे मानले जाते की दिवे लावून झोपल्याने झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून येतो. यामुळे तुम्हाला ऑफिसची कामे करण्यात अडचण येऊ शकते. झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला सुस्त आणि थकल्यासारखे वाटू शकते. तसेच लक्ष केंद्रित करण्यातही अडचणी येऊ शकतात.