नवी दिल्ली – जगात काही असे लोक असतात ज्यांना खूप झोप (sleep) येते, तर काही लोक असेही असतात ज्यांना बिलकूल झोप येत नाही. ही दोन्ही परिस्थिती अजब असते. जर एखाद्या व्यक्तीला झोप येत नसेल तर ते त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत. कोणाची झोप नीट झाली नसेल (lack of sleep) तर त्या व्यक्तीचे डोळे जडावलेले राहतात आणि डोकेदुखीचा (headache) त्रासही होतो. यामुळेच असे म्हटले जाते की शांत व पुरेशी झोप ही आरोग्यासाठी गरजेची असते.
कमी झोपेमुळे लोकांना हार्ट ॲटॅक येण्याचा धोका आणि ब्लड प्रेशरची समस्या उद्बवू शकते, हे तुम्ही ऐकलं असेल. पण जे लोक कमी झोप घेतात त्यांच्या केसांची क्वॉलिटीही खराब असते व ते गळू लागतात, हे तुम्हाला माहीत आहे का ? झोप आणि केसगळती यांचा काय संबंध आहे ते जाणून घेऊया.
कमी झोपेचा शरीरावर काय परिणाम होतो ?
मिळालेल्या माहितीनुसार, स्लीप सायकलमध्ये कमी झोप झाली तर ती व्यक्ती तणावात राहते. तसंच डोक्यातील रक्ताभिसरणही बिघडतं. अशा वेळी केसांच्या मुळांना रक्त, पोषक द्रव्ये आणि ऑक्सिजन यांचा योग्य प्रकारे पुरवठा होत नाही, त्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात आणि केस गळू लागतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुरेशी व शांत झोप घेणे हे महत्वाचे आहे.
किती तासांची झोप असते आवश्यक ?
– रोजचे कार्य नीट व सुरळीतपणे करता यावे यासाठी एका सामान्य व्यक्तीला कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. कोणी यापेक्षा कमी तास झोपत असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात तणाव कायम राहतात.
जर तुम्हाला नीट झोप येत नसेल तर हे करून पाहा.
– तुमच्या झोपेचे चक्र (sleep cycle) नियमित करण्याचा प्रयत्न करा.
– झोपताना आपल्या खोलीत पूर्ण अंधार नसावा, थोडा अंधुक प्रकाश ठेवणे देखील महत्वाचे आहे.
– आजूबाजूला होणाऱ्या आवाजामुळेही नीट झोप लागण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे झोप मोडू नये म्हणून शांत जागी झोपावे.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)